बुधवार, २८ डिसेंबर, २०११

संकल्प : नवीन वर्षाचा

 नवीन वर्ष सुरु होण्यास काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. घरी बाहेर सगळीकडे नवीन वर्ष्यात काय नवा संकल्प करायचा व गेल्या वर्षी च्या संकल्पाचे काय झाले या बाबतही या विषयीच्या चर्चा सुरु आहेत. कोणताही   संकल्प करताना त्या बाबत सर्व बाजूनी विचार करावा.तरच तो शेवट पर्यंत टिकून राहतो.


माझ्या मताप्रमाणे संकल्प असा करावा कि ज्यामुळे आपलेच नाही तर सर्वांचे चांगले होईल. असाच एक संकल्प माझ्या मनात आहे कि आपण सर्वांनी आसाच एक संकल्प कि आपले कोणतेही सरकारी काम एकही दाम न देता करू  किंवा दुसर्याला लाच न देण्यापासून परावृत्त करू. मला माहित आहे कि हे सहज होणारे काम नाही परंतु सुरुवात ही कोनानाकोनाला करावी लागेल. भ्रष्टाचार मिटविण्यासाठी सुरुवात झाली आहे. त्यात मध्ये आपलाही थोडासा सहभाग पाहिजे.

रविवार, २८ ऑगस्ट, २०११

" मी अण्णा हजारे आहे"

आज अण्णा च्या लढाईचा एक टप्पा पार पडला. सरकारने मजबुरीने का होईना संसदे मध्ये जन लोकपाल विधेयकाला पाठींबा दर्शविला.किवा आंदोलना पुढे सरकार दोन पाऊले मागे आली.आता आपली म्हणजे भारतीयांची एक जवाबदारी वाढली जो पर्यंत विध्येयक संसदेत पारित होऊन कायदा तयार होत नाही तो पर्यंत अण्णा जेव्हा जेव्हा आवाज देतील तेव्हा त्यांच्या पाठीशी असेच एक होऊन उभे राहायचं. 


आणि अजून एक काम करावयाचे अण्णाची टोपी म्हणजे " मी अण्णा हजारे आहे" लिहलेली हि पांढरी टोपी घालून आपले कोणतेही शासकीय काम आसो ते होत नसेल किंवा आपल्याला ते करण्या साठी लाच मागितली जात असेल सरकारी बाबू ते करण्यास टाळाटाळ करीत असेल हि टोपी घालून जाऊ.समोरचा सरकारी कर्मचारी वचकून जाऊन ते काम लवकर करेल.आश्या रीतीने आपला त्याचावर वाचक निर्माण होईल.अण्णांच्या भ्रष्टाचार संपविण्याच्या कार्यात आपला सहभाग असेल. आणि अण्णांनी लावली ज्योत आशीच तेवत राहील. 

रविवार, २१ ऑगस्ट, २०११

दुसऱ्या स्वतंत्र लढ्याची सुरवात


गेल्या काही महिन्यांपासून उघडकीस आलेल्या एकामागून एक घोटाळ्यातून शासन व्यवस्थेचा खरा चेहरा जनते समोर आला आहे. आपण ज्यांना मोठ्या विश्वासाने निवडून देतो ते आपले लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्या ऎवजी स्वतः ची तुंबडी भरण्यात मश्गुल झालेले आहेत.कारण निवडणूक असा धंदा आहे, कि त्यामध्ये एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि मग पाच वर्ष्यात किती तरी पटीने वसूल करता येतो.


आज संसदेत अर्धेअधिक प्रतिनिधी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत तर काहीं वर न्यायालयात खटले चालू आहेत.खरे तर असे लोक आपण का निवडून देतो हा मुद्दा विचार करण्या सारखा आहे  आपल्या देश्यातील जनता ही रोजच्या कामात इतकी व्यस्त झालेली आहे. कि तिला आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव असून ती जाणीव पूर्वक त्या कडे दुर्लक्ष करीत आहे. पण आण्णा हजारेच्या सध्या सुरु आंदोलनावरून असे दिसून येते कि सामान्य जनता जागी झाली आहे देश्यात वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे त्रस्त होवून ती रस्त्यावर उतरली आहे.कोणतेही आंदोलन हे घरात बसून होत नसते.अण्णांच्या या आंदोलनामध्ये सर्वात जास्त सहभाग आहे तो तरुणांचा.कारण कोणतेही आंदोलन तरुणांच्या सहकार्याने यशस्वी होत.


गेल्या काही महिन्यात उघडकीस आलेल्या घोटाळया मुले सर्व सामन्यात असणारा असंतोष व सरकारचा निर्णय घेण्यासाठी वेळ काढू पणा अश्यातच अण्णांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य लोकांच्या उद्रेकाला वाट मिळाली. आता नाही तर केव्हा नाही. अश्या विचाराने सामान्य जनता रस्त्यावर आली. हि तर सुरुवात आहे. स्वतंत्र आंदोलनाची सुरवात हि मंगल पांडे यांच्या उठवाने झाली होती तेव्हाची जनता पण इंग्रजांच्या जुलमाला कंटाळली होती. त्याला वाट मिळाली ती मंगल पांड्ये यांच्या उठावामुळे. आजही तशीच परिस्थिती निर्माण झाली.सरकारच्या नाकर्ते पणामुळे व भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी सरकारचा वेळकाढूपणा या मुळे सर्व जनतेत   रोष निर्माण झाला. म्हणून सर्वांनी आण्णांच्या आंदोलनाला पाठींबा देण्या साठी एकत्र आले. निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी शासन व्यवस्था नीट चालावी या साठी कायदे करावे.या कायद्याचा वापर सर्वसामान्याच्या भल्या साठी होईल अशी व्यवस्था निर्माण करावी. हा लोकशाहीचा उद्देश आहे. परन्तु सध्या उलटेच सुरु आहे. या सर्वांवर अंकुश ठेवण्य साठी अण्णांचे जन्लोक्पाल विध्येयक संसदेत पारित होणे गरजेचे आहे.

सोमवार, १ ऑगस्ट, २०११

बस एक नजर चाहिये

 गेल्या ६-७ महिन्यान पासून सेवाग्राम आश्रमातील लोक गांधीजींचा चष्मा शोधतात पण तो काही सापडत नाही. सेवाग्राम (वर्धा महाराष्ट्र राज्य) येथे गांधीजींचा आश्रम असून तेथे गांधीजीच्या वापरातील वस्तू ठेवल्या आहेत. त्या पैकी हा चष्मा होता तो काही महिन्या पासून हरवला आहे किंवा चोरीला गेला आहे. अजून पर्यंत काही सापडला नाही.सर्वी कडे शोधाशोध सुरु आहे. 


तस पहिलतर माणूस ज्या प्रकारचा चष्मा डोळ्यावर लावतो त्याला सारे जग तसे दिसते असे म्हणतात येथे चष्मा न लावता  नजर च मेली आहे. रस्त्याने आपण जाताना जर कोणाचा अपघात झाला किंवा कोणी संकटात दिसला तर आपण त्याला मदत करण्या ऐवजी उगाच फुकट वेळ जाईल, फालतू पोलिसांचे लचांड मागे लागेल,हे तर नेहमीचेच आहे हा विचार करून त्या कडे दुर्लक्ष करतो. याचा अर्थ असा कि आपली नजर मेली आहे.पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.मानवतेच्या गप्पा मारणारे आपण दुसर्याला मदत करण्याची वेळ आली कि आपण आपला फायदा काय याचा विचार करतो. 


गांधीजी चा सर्वानकडे माणूस म्हणून पाहायचे प्रत्येक माणसात ईश्वरी अंश आसतो नजर लागते फक्त ओळखण्याची,  हि नजर च हरविली आहे. अश्या नजर हरविलेल्या लोकांना हा चष्मा सापडेलच कसा. सकाळी उठल्यावर आपण वर्तमान पत्र वाचतो त्यामध्ये अपहरण,घोटाळा,खून अश्या बातम्या ठासून भरलेल्या आसतात आणि आपण मोठ्या चवीने त्या वाचत आसतो.व सरकारला दोष देवून आपल्या नियमित कामाला लागतो.


 जगात स्पर्धा वाढल्या मुळे प्रत्येक जन आपल्या कामात मग्न आसतो. अंतिम ध्येय हे पैसा असल्या मुळे तो जास्तीत जास्त कसा कमावता येईल या कडे सर्वांचे लक्ष आसते आपल्या आजूबाजूला काय घडत आहे या कडे आपले लक्ष नाही. पैसा कमविण्या साठी कोणत्याही थराला जायची आपली तयारी असते. यातूनच २ जी  सारखे घोटाळे जन्माला आले. सत्य, अहिंसा, परोपकार आदी गोष्टी खूप मागे पडल्या आहे. आणि ह्या गोष्टी समजविण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला कोणी जुमानत नाही. आपण जर आपली जर नजर (दृष्टीकोन) बदललात तर हा चष्मा नक्कीच सापडेल.  

शुक्रवार, २२ जुलै, २०११

आता एकाच उपाय भ्रष्टाचार कमी करण्याचा "कायदेशीर लाचखोरी"

"आज जन्माच्या दाखल्या काढण्या पासून मृत्युच्या दाखला मिळवे पर्यंत प्रत्येक ठिकाणी लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत.हि कीड एवढी फोफावली आहे कि, याला आळा घालायचा असेल तर लाच देण्याची प्रकिया कायदेशीर करायला हवी" असे मत श्री एन. आर. नारायणमूर्ती माजी अध्यक्ष इन्फोसीस यांचे आहे यांच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. समाजात आज सर्वीकडे भ्रष्टाचार आहे. व्यवहाराच्या प्रत्येक प्रकियेत लाचेचे एक महत्वाचे स्थान आहे. या शिवाय व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण होत नाही .शासकीय कार्यालये तर याचे माहेर आहे.


जर कायद्याने जर लाच देणे घेणे बंधन कारक झाले तर विचार करा सर्व सरकारी कार्यालयात कामे होण्याचे प्रमाण वाढेल. प्रत्येक कर्मचारी शिपाया पासून तर साहेबापर्यंत काम करताना  दिसेल कारण त्यांना हे माहित असेल कि आपण जे काम करतो आहे यात होणार्या कामायेत साहेबा सोबत आपला पण हिस्सा आहे आणि ते, ते काम इमानदारीने मन लावून करतील.प्रत्येक सरकारी योजनेचे उदिष्ट १०० टक्के पूर्ण होईल. व सरकार कडून आलेला निधी परत जाणार नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी पण खुश होतील. 


मी तर म्हणतोय सरकारने या साठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे यात प्रयेक कामाच्या लाचेचे दर ठरवावे. त्याचा एक जी आर काढून सर्वाना कळवावा किंवा वर्तमान पत्रात जाहीर करावे. प्रत्येक सरकारी कार्यालयात अधिकार्याच्या पाटी खाली त्याच्या अधिकारातील कामाचे दर लिहावेत. जेणे करून जनतेला माहित होईल. भारतामध्ये लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे "लोकांनी,लोकांसाठी लोकांच्या वतीने चालविलेले राज्य" आता असे म्हणावे लागते कि काही लोकांनी,काही लोकांसाठी लाचेच्या वतीने चालविलेले राज्य. या अश्या राज्यात जो व्यक्ती लाच घेत नाही किवा घेऊ देत नाही त्यास त्याचे इतर साथीदार त्रास देतात. जर लाचखोरी जर कायदेशीर झाली तर लाच घेण्यार्या व्यक्तीला जनाची नाही तर मनाची लाज वाटेल.

बुधवार, १८ मे, २०११

भारताची गुप्तचर यंत्रणा

भारताची गुप्तचर यंत्रणेचा दर्जा फारच ढासळत चालला आहे. हे पुन्हा एकदा सरकारने भारतीयांना दाखवून दिले आहे. भारतावर जे अतिरेक्यांनी हल्ये केले,बॉम्बस्पोट घडवून आणले किंवा यात सहभागी असलेले फरार  दहशतवादी याची यादी भारत सरकारने शेजारच्या राष्ट्राला सदर केली.या यादीत समाविष्ट असलेला वझुर कमर खान हा दहशतवादी मुंबईतच गेल्या अनेक वर्षापासून राहत आहे याची भारतीय गुप्तचर यंत्रणेला व सरकारला माहिती नाही.यावरून हे लक्षात येतेकी भारतीय गुप्तचर यंत्रणा किती सुस्त झाली.आहे.वझुर कमर हा सन २००३ मध्ये मुलुंड येथे झालेल्या रेल्वे बॉम्बस्पोटातील आरोपी आहे. त्याची जामिनावर सुटका झाली आहे.

हा प्रकार जेव्हा मिडीयाने उघडकीस  आणला. तेव्हा सरकारला जग आली. या वर भारताचे गृहमंत्री यांचे वक्तव्य आणखी चीड आणण्या सारखे आहे ते पत्रकारांना म्हणतात कि मी ही यादी बनवलेली नाही फक्त एकच नाव चुकले आहे, बाकीचे ४९ नावे बरोबर आहे. जेव्हा हि यादी तयार केली असेल तेव्हा ती किती तरी वरिष्ठ अनुभवी अधिकाऱ्यांच्या नजरे खालून गेली असेल.कित्येक वेळा प्रत्येकाचे नावावर चर्चा झाली असेल.आपण आपल्या घराची महिन्याची साधी किराणा यादी तयार करताना घरातील प्रत्येकाचे मत घेतो.नंतर ठरवतो. 

दरवर्षी देशाच्या एकूण उत्पनातील फार मोठा भाग हा देश्याच्या सुरक्षे साठी खर्च केला जातो इतक्या मोठ्या खर्चाचे फलित जर हे असेल तर त्याचा उपयोग काय? 

तसे पाहीलेतर कोणत्याही देशाची गुप्तचर यंत्रणा ही फार मजबूत असायला हवी. त्यामुळे देशात काय चालले या  संबंधी राज्य कर्त्याला माहिती मिळत आसते.श्री शिवाजी महारांजाच्या काळात बहार्जी नाईक सारखे अनेक गुप्तहेर होते म्हणून महारांज शत्रूवर मात करू शकले.शत्रूच्या प्रत्येक हालचालीची खडान्खडा माहिती हे गुप्त हेर महाराजांना देत असत त्यामुळे महाराजांच्या प्रत्येक योजना यशस्वी झाल्या.त्यामुळे आजही अश्या बहार्जी नाईकांची गरज आहे.

रविवार, २४ एप्रिल, २०११

अजब भिकारी

 भिकारी म्हटला कि, फाटके मळके कपडे घातलेली,ओबड-धोबड चेहऱ्याची कितीही नाही म्हंटले तरी तुमचा पिछ्या न सोडणारी लोचट व्यक्ती डोळ्या समोर उभी राहते.रस्त्याने,स्टेशन च्या बाहेर,बस स्थानक,देवळा जवळ हमखास दिसते.कारण त्यांना माहित असते कि माणसाच्या मनात श्रद्धा,दया करूणा भरलेली आहे आणि माणसाची हीच वृत्ती त्याला भिक देण्यासाठी मजबूर करीत असते.


मुंबईच्या या भिकार्यांच्या जीवनावर एक "ट्राफिक सिग्नल" नावाचा चित्रपट सुद्धा निघाला आहे.अश्या या भिकारी संबंधी लोकमत या वृत्तपत्रात एक बातमी वाचण्यात आली. या बातमी नुसार एकट्या मुंबई मध्ये आज साडे तीन लाखाच्या वर भिकारी आहे.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात यांची संख्या तेवढीच आहे. आणि ती वाढत्या बेकारीमुळे वाढतच आहे.कारण भिक मागणे हा बिन भांडवलीचा धंदा आहे.तस पाहीलेतर भिकारी हा शासनाच्या दृष्टीने दुर्लक्षित घटक आहे.त्याला ह्या व्यवसायापासून परावृत्त करण्या साठी शासनाजवळ कोणत्याही ठोस योजना नाही.


भिकार्याच्या मालमत्ते विषयीची माहिती जेव्हा शासना समोर आली तेव्हा अनेकांनी तोंडात बोटे घातली.मुंबईतील एकूण भिकाऱ्या पैकी काही भिकारी श्रीमंत असून त्यांच्या नावावर मुंबईत फ्ल्याट आहेत तर काहींच्या नावाने बँकेत लाखोंच्या ठेवी आहेत.काही भिकारी तर उच्यविद्याविभूषित आहे त्यांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला आहे.काहींच्या तर पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करीत आहे.हा असा एक धंदा आहे कि ज्या मध्ये कोणताही कर द्यावा लागत नाही.मिळणारे उत्पन्न हे करमुक्त असल्या मुळे त्याचा हिशोब ठेवावा लागत नाही.एकट्या मुंबईत भिकार्याच्या  पैश्याची वार्षिक उलाढाल एकशे ऐंशी कोटीच्या पेक्ष्या जास्त आहे. तुम्हाला रस्त्याने जाताना एखाद्या भिकार्याने भिक मागितली तर त्याला पैसे देताना नीट विचार करा कि, तुम्ही ज्याला भिक देत आहात तो कदाचित तुमच्या पेक्षाही श्रीमंत असू शकतो. नाही का? 

शनिवार, १६ एप्रिल, २०११

रामदेव बाबा इकडे पण लक्ष द्या

विदेशामध्ये असलेला भारतीयांचा (?) काळा पैसा आणण्यासाठी बाबा रामदेव भारतभर आंदोलनात अग्रेसर आहे. त्याला माझा पूर्ण पाठींबा आहे.जसा हा पैसा भारतात एक दिवस नक्की येईल.

पण भारतातील अनेक मोठया देवस्थाना जवळ असलेला अमाप संपती आहे.ह्या देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न एका राज्याच्या उत्पनापेक्ष्या निश्चित जास्त आहे.भारतीय लोक दैववादी आहे देवाला मानणारे आहे. आपल्या उत्पन्नातील काही भाग देवाला अर्पण करावा,किंवा दान धर्म केल्याने पुण्य मिळते. असे संस्कार त्याच्यावर झालेले असतात. तेव्हा ते त्यांना जमेल तितका हिस्सा देवाला म्हणजे देवाच्या नावाने तयार झालेल्या संस्थानाला दान देत असतात. याच कृतीतून जितका देवाचा प्रकोप जास्त तितके त्याच्या नावाने तयार झालेल्या देवस्थानाला उत्पन जास्त.परंतु गेल्या काही दशकात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळल्या मुले लोकांचे उत्पन्न पण वाढले. आणि पाप लागू नये म्हणून दानधर्माच्या रकमेतही वाढ झाली.यामुळे देवस्थानच्या उत्पनात वाढ झाली.या संस्थांच्या नावावर त्यांच्या पिढ्यानपिढ्या जगू लागल्या व संस्थानावर आपलेच वर्चस्व राहावे या साठी घाणरडे राजकारण सुरु झाले.भारतात जितके कठोर कायदे आहेत पण तितक्या पळवाटा पण आहे असे संस्थानिक मोठमोठ्या कायदे पंडितांची फौज बाळगून असतात.त्यामुळे त्याच्या वर कोणी आरोप केले तर ते या कायदे पंडितांच्या मदतीने सहज आरोपातून मोकळे होतात. सरकारही त्यांच्या भानगडीत पडत नाही.

भ्रष्ट मार्गाने येणारा पैसा त्याचा सोबत पाप ही घेऊन येतो. या पापाचा आपल्या कुटुंबावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून हे लोक नेहमी दान करीत असतात.कारण त्यांचा समज असतो कि दान केल्याने पाप कमी होते.
दान देणाऱ्या मध्ये सर्वात आघाडीवर राजकारणी, मोठया हुद्दयाचे, श्रीमंत  लोक असतात.त्यांचीच चर्चा सर्वत्र होत असते. किंवा  हे लोक अश्या प्रकारच्या बातम्या स्वत छापून आणतात.स्वताचा उदोउदो करून घेतात. आणि आपणही अश्या बातम्या मोठया चवीने वाचतो.आपण कधी हा विचार करत नाही, ह्या व्यक्तीजवळ इतका पैसा कोठून व कसा आला? आपण फक्त त्याने केलेल्या दानाबद्दल दिवसभर चर्चा करीत बसतो.एखाद्या गरिबाने मेहनतीने कमाविलेल्या धनातून काही देवाला दान दिलेतर त्याची कोठे उल्लेखही होत नाही. देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. तो तर सर्वांचा निर्माता आहे त्याच्या जवळ कश्याचीच कमी नाही.

 देवस्थाना जवळ असणारा पैसा हा जर त्या भागातील लोक विकास, शिक्षण या साठी वापरला तर देशातून गरिबी नावाची वस्तू लवकरच नाहीशी होईल. अश्या संस्थानाच्या वर्षानुवर्षे पडून असलेली कोट्यावधी रुपयाची संपती मोकळी करण्या साठी बाबा रामदेव यांनी त्यांच्या नवीन पक्ष्या तर्फे आंदोलन सुरु करावे.कारण  भारतातील हा पडून असलेला पैसा भारताच्या विकासासाठी वापरणे तितकेच गरजेचे आहे जितका परदेशातील   पैसा भारतात आणणे. नाही का ? 

मंगळवार, १२ एप्रिल, २०११

शेम वाटसन

सध्या ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेश चा दौरा सुरु आहे.बांगला देश्याशी परवा झालेल्या सामन्यात वाटसन ने म्हणे पंच्यानाव चेंडूत एकशे पंच्यांशी धावा काढल्या.विश्व चषकातील झालेल्या पराभव व त्यामुळे झालेली मानहानी तीन वेळा विश्व विजेते पद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी फार जिव्हारी लागले आणि अश्या मानसिक अवस्थेमध्ये असताना विश्व क्रिकेट क्षेत्रात फारसा अनुभव नसणाऱ्या बांगला देश्याच्या क्रिकेट टीमशी त्यांचा सामना झाला.हे म्हणजे असे झाले बबर शेर, आधीच भुकेला त्यात त्याच्या समोर गरीब बिचारी शेळी आली तर तो तिचा फडश्या पडणारच. 


विक्रम करताना तो भारत,श्रीलंका,इंग्लंड,दक्षिण आफ्रिका सारख्या अनुभवी देशा विरुद्ध खेळताना झाला तर त्याचे महत्व अधिक असते.बांगला देशाची क्रिकेट टीम नवीन असून त्यांच्या खेळाडूना आंतर्राष्टीय सामना खेळण्याचे जास्त अनुभव नाही. अश्यातच त्यांचा सामना विजयासाठी चवताळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी झाला.मग विक्रम होणारच.त्यात काय नवल.उलट आमच्या सचिन तेंडूलकर ने सन २०१० मध्ये क्रिकेट क्षेत्रात बलाढ्य समजल्या जाणार्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नाबाद २०० धावा काढल्या आहेत हा विक्रम तोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाची पुढची पिढी जन्माला यावी लागेल. 


ऑस्ट्रेलियाचा जेष्ठ खेळाडू हेडन याने सन २००७ साली न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक १८१ धावा काढल्या होत्या.स्वताच्या खेळाडूचा विक्रम मोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाला चार वर्ष लागली सचिनचा नाबाद २०० धावांचा विक्रम मोडण्यासाठी अजून काही वर्ष त्यांना वाट पहावी लागणार हे मात्र खरे.

शनिवार, ९ एप्रिल, २०११

अशी आपली बायको असावी

आज सायंकाळी माझा इनबॉक्स उघडला असता मित्राने पाठविलेला बायको विषयीचा एक सुंदर पण विनोदी स्वरूपाचा इमेल दिसला. तो ब्लॉग वाचकांसाठी देत आहे.तस पहिले तर ऐंशी टक्के नवरोबाची आपल्या सहचारणी विषयी हीच अपेक्षा असते.म्हणूनच त्यांना दुसर्याची बायको नेहमी सुंदर दिसते.आपल्याही बायको मध्ये चांगले सद्गुण शोधा म्हणजे ती (स्वतःची) बायको पण वागणुकीने सुंदर वाटेल.

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

उपोषण लोकशाहीतील एक जालीम हथियार

                             भारताच्या राजधानी मध्ये जनालोकपाल विध्येयाकासाठी जंतर मंतर चौकात अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला देशभरातून व सर्व स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याला जनांदोलनाचे स्वरूप प्राप्त होत आहे.सायंकाळच्या बातमीपत्रानुसार सरकारने अण्णाच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या असून उपोषण संपण्याच्या अंतिम टप्यात आहे.

                             भारताने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे म्हणजे, "लोकांनी,लोकांतर्फे लोकांसाठी चालवलेली शासन व्यवस्था." ही व्यवस्था ज्या लोकांच्या हातात असते, त्या लोकांना त्याची मस्ती चढते ही चढलेली मस्ती उतरविण्याचे काम उपोषण नावाचे हथियार करीत असते.ह्या हत्याराचा वापर महात्मा गांधी यांनी फार चांगला केला.आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.किंवा शासनावर वचक,अंकुश ठेवण्याचे काम लोकांचे उपोषण करीत असते. उपोषण करण्याचा तुमचा हेतू जर लोक कल्याणाचा असेल तर त्याला विविध क्षेत्रातून पाठींबा मिळत जातो. शासनातील राजकारणी लोक जर शासन व्यवस्थेचा वापर जर स्वतःच्या स्वार्थासाठी करीत असतील तर त्यांना लोकांनी उपोषणाचा वापर करून समज दिली आहे.हे आपण कित्येक वेळा पहिले आहे.जगात प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते.कोणत्याही प्रकारची हिंसा न करता जगातील सर्व समस्या सोडवता येतात असा महात्मा गांधी चा विश्वास होता. आणि ह्याचा प्रत्यय त्यांनी अनेकदा आणून दिला.पण तत्कालीन स्वार्थी राजकारण्यांनी त्याचा घात केला.

                             आम्ह्च्या शहरात एक चौक आहे.त्या चौकात दर हप्त्याला कोणींकोनी कसल्या तरी कारणासाठी उपोषणाला तंबू लावून बसलेला असतो.आम्ही त्या चौकाला उपोषण चौक म्हणतो.देशातील सर्व स्तरातील लोकांना शासन दरबारी शासकीय कामासाठी जावे लागते.आज काल सर्व सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार बोलकावलेला आहे अधिकारी वर्गाला टेबला खालून पैसे दिल्या शिवाय ते काम करीत नाही.ज्यांच्या जवळ पैसा आहे त्याची कामे ही लोक पटापट करतात पण हातावर जीवन जगणाऱ्या गरिबाच्या कामाचे काय? तेंव्हा त्यांना आपले काम करून घेण्यासाठी उपोषण नावाच्या हत्याराचा वापर करावा लागतो. 

                             तेंव्हा अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या लढयामध्ये आपणही आपल्याला जमेल त्या मार्गाने सहभागी होवू.व महात्मा गांधीनी दिलेल्या अनोख्या शस्त्राचा वापर या पुढे शासनावर अंकुश ठेवण्यासाठी करू. 
                                                                          \\जय हिंद\\ 

बुधवार, ६ एप्रिल, २०११

गुरु ग्यारी बाय बाय

'टीम इंडियाला विश्व विजेता बनण्यासाठी मार्गदर्शन करणारे भारतीय संघाचे प्रशिक्षक Gary Kristen  आज आपल्या देशी परत गेले. त्यांनी गेल्या तीन चार वर्षापासून भारतीय संघाच्या केवळ खेळाकडेच लक्ष दिले नाही, तर मनोबल वाढवून विपरीत परिस्थितीत कसे एकसंघ राहून खेळायचे हे शिकवले. त्यांचा मार्गदर्शना खाली भारतीय संघाने फलंदाजी,गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्र रक्षण या बाबत प्रशिक्षण घेतले. त्यांनी खेळाडूला मैदानात व मैदाना बाहेर कसे वागावे याचे सल्ले दिले.त्यांनी संघाची विजयाची गती कायम ठेवणे हि प्रशिक्षका साठी एक मोठे आव्हान असते. मग कसोटी सामने असो कि २०-२० किंवा एकदिवसीय सामने सर्व मध्ये भारतीय टीमची कामगिरी सर्व श्रेष्ठ राहिली.भारतीय संघाने पण त्यांना सर्वोतपरी मदत केली.''  तेव्हा परत एकदा त्याचे आभार.    

मंगळवार, ५ एप्रिल, २०११

इतर खेळांना पण राजाश्रय मिळाला पाहिजे...

  भारताने २८ वर्षानंतर क्रिकेट चा विश्व चषक मिळवला त्याबद्दल सर्व खेळाडूचे हार्दिक अभिनंदन.......
 भारताचा तिरंगा क्रिकेटच्या विश्वामध्ये अभिमानाने फडकविणार्या खेळाडूवर सगळीकडून अभिनंदनाचा व बक्षिसाचा वर्षाव होत आहे.आयसीसी कडून भारतीय संघाला १३.२० कोटी रुपये तर बीसीसीआय ने प्रत्येक खेळाडूला एक एक कोटी रुपयाचे बक्षीस मिळणार आहे.महाराष्ट्र सरकारही एक एक कोटी रुपये देणार आहे.कर्नाटक सरकार प्रत्येक खेळाडूंना एक भूखंड देणार आहे, दिल्ली सरकारही एक एक कोटी रुपये देणार आहे. म्हणजे भारतीय संघामध्ये ज्या ज्या राज्याचे खेळाडू आहे ती ती राज्ये त्यांना बक्षीस देणार आहे.अश्या रीतीने प्रत्येक खेळाडू मालामाल होणार आहे.

सरकार कडे जमा होणाऱ्या पैश्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे कर,उपकर. हा पैसा जनतेने आपल्या उत्पन्नातून व्यवहारातून कराच्या स्वरुपात शासन दरबारी जमा केला असतो.शासन या पैश्याचा वापर जनतेला सुखसुविधा,सुरक्षा पुरवण्या नवनवीन योजना साठी व शासनाचा खर्च भागविण्या साठी करीत असते.परंतु अश्या प्रकारची खेळाडूना मोठमोठ्या रकमेची बक्षिसे देण्याचा अधिकार शासनाला आहे काय?.खर तर खेळाच्या तिकीट विक्रीतून जमा होणाऱ्या उत्पन्नातून बक्षिसे देणे हे योग्य आहे. 

शासनाने हा पैसा राज्यातील इतर नवोदित खेळाडूना त्यांचा खेळ सुधारण्यासाठी,त्यांना त्यांच्या खेळासाठी आवश्यक असणारी आधुनिक साधने, नवीन मैदाने खेळाविषयी इतर सवलती आदी साठी वापरला तर क्रिकेट शिवाय इतर खेळातही आपला देश नाव कमवील. ओलम्पिक मध्ये आपला देश पहिल्या दहा मध्ये पण नसतो. एखाद दोन खेळात चांगली कामगिरी सोडलीतर बाकीच्या खेळात आपले खेळाडू इतर देशांच्या तुलनेत तग धरू शकत नाही..चीन,जपान, उत्तर कोरिया सारख्या देशात खेळांना अधिक महत्व दिले जाते. तेथील सरकार त्यांच्या देश्यातील तरुणांना खेळात चांगल्या सुविधा उपलब्द करून प्रोत्साहन देतात.म्हणून त्याचे खेळाडू सर्व प्रकारच्या खेळात अग्रेसर राहतात.

आपल्या कडे एक किकेटचा खेळ सोडला तर हॉकी,कब्बडी,फुटबॉल,रानिग भारतीय परंपरागत खेळ या इतर खेळामध्ये कोणी क्यारिअर म्हणून पाहत नाही याचे मुख्य कारण म्हणजे ह्या खेळात नाव कमविले तरी खेळाडूला जास्त पैसा मिळत नाही.किंवा त्याचे नाव कायमचे लोकांच्या ध्यानात राहत नाही.पण क्रिकेट मध्ये एक जरी सामना एखद्या खेळाडूने खेळला तर त्याचे नाव लोक विसरत नाही.क्रिकेट मुळे त्याला फार प्रसिद्धी मिळते.व तो लोकांच्या कायम मनात राहतो.एकूण काय इतर खेलापेक्ष्या क्रिकेट मध्ये फार पैसा व प्रसिद्धी आहे.

तेव्हा क्रिकेट ला जास्त महत्व न देता इतर खेळ कसे लोकप्रिय होतील व त्या मध्ये नव नवीन खेळाडू कसे तयार होतील या साठी शासनाने नवीन क्रीडा विषयीचे धोरण ठरवून त्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. इतर खेळातील खेळाडूंना सर्वच स्तरातून प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. जसा क्रिकेटला राजाश्रय मिळाला तसा इतर खेळला पण मिळाला पाहिजे.इतकी इच्छा आहे.



मंगळवार, २९ मार्च, २०११

वाघाची संख्या वाढली......एक बातमी

आज जवळपास सर्वच दैनिका मध्ये एक चांगली बातमी वाचायला मिळाली की, देशामध्ये वाघाची संख्या २९५ ने वाढली. वाघांसाठी आरक्षित असणाऱ्या १७ राज्यातील ३९ प्रकल्पामध्ये एकूण १७०६ वाघ आढळले.सन २००६ च्या वाघांच्या गणणे नुसार देशात १४११ वाघ होते. चालू वर्षीच्या गणणे नुसार ही संख्या २९५ ने वाढून १७०६ इतकी झाली.जगातील एकूण वाघांपैकी जवळपास निम्मे वाघ भारतात आहे.वाघाची कमी होणारी संख्या ही सर्वच देश्यापुढे गंभीर समस्या होती.परंतु दूरदृष्टी समोर ठेवून केलेल्या उपाय योजनांचा हा परिणाम आहे.
झपाट्याने कमी होणारया जंगला मुळे जंगलातील प्राणी त्याची तहान-भूक भागवण्यासाठी लगतच्या गावात शिरतात.व गावकरी स्वताच्या जिवाच्या भीतीने त्यांना मारून टाकतात या मध्ये वाघाची संख्या जास्त असल्यामुळे देशभरातून वाघाची संख्या दिवसेंदिवस कमी होत होती परंतु सरकारी उपाय योजनेमुळे आता ही संख्या वाढू लागली आहे.भारतामध्ये वाघांच्या शिकारीवर बंदी असली तरीही वाघाच्या कातडीला चांगली किमत मिळत असल्या मुळे लपून छपून याची शिकार चालू आहे.पण सरकारच्या सतर्क वनविभागा मुळे अश्या प्रकारच्या शिकारीला खीळ बसला आहे.याचे परिणाम आता दिसू लागले आहे.जंगलाचा राजा जर जंगलातून कमी होत गेला तर जंगलात काहीच उरणार नाही.मागे आम्ही विदर्भातील ताडोबाच्या सफारीला गेलो होतो.तिथे दोन दिवस राहून वाघाचे दर्शन आम्हाला झाले नाही.त्यामुळे आम्ही सर्वच उदास झालो होतो परंतु पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा तेथे जाऊ तेव्हा आता आम्हाला नक्कीच वाघाचे दर्शन होईल. 

शनिवार, २६ मार्च, २०११

वैश्विक वसुंधरा तास

वीज हि कोणत्याही देशाची राष्ट्रीय संपत्ती असते.आज जगभरात जवळ जवळ १३१ पेक्षा जास्त देशामधील पाच हजार शहरात एक तास वीज बंद ठेवून "वैश्विक वसुंधरा" तास पाळण्यात येणार आहे.दर वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पाळण्यात येतो.या दिवशी रात्री ८.३० ते ९.३० काळात शहरातील सर्व वीज दिवे बंद ठेवण्यात येतात. याची सुरवात सन २००७ पासून ओस्ट्रेलिया या देशापासून झाली.सध्या जगातील सर्व देशांना गोबल वार्मिंग चा प्रश्न चांगला भेडसावत आहे. सर्वीकडे पृथ्वीवरचे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.या मुळे बर्फाळ भागातील बर्फ सारखा वितळत असून पर्यावरणा साठी मोठा धोका निर्माण होत आहे.आज मानवाच्या जीवनात सकाळी झोपेतून उठल्या पासून  रात्री झोपेपर्यंत विजेच्या वापराचा अतिरेक झाल्यामुळे ग्लोबल वार्मिंग चे संकट जगासमोर उभे राहिले आहे.बहुतांशी देशा मध्ये वीज निर्माण करतांना कोळसा चा वापर करतात.या मुळे निर्माण होणारी राख सर्वत्र पसरते.त्यामुळे त्या भागात राहणाऱ्या लोकांना श्वसनाचे आजार निर्माण होतात.

यावर महाराष्ट्र सरकारने भार नियमनाचा उपाय काढला आहे परंतु हे भार नियमन राज्यातील खेडे विभागात जास्त राबविण्यात येते. विजेचा जास्त वापर हा खेड्यात नसून शहरात आहे. शहरांना वीज कमी पडू नये म्हणून खेड्यात भारनियमन करण्यात येते. तेव्हा हा वैश्विक वसुंधरा तास शहरांसाठी किती महत्वाचा आहे. या एकतासात शहरातील मोठ मोठे कारखाने काही काळासाठी बंद राहतील आणि त्याच काळामध्ये वीज निर्माण करणारे उर्जा प्रकाल्पामधील निर्माण होणारी वीज खेड्याकडे वळवता येईल. या साठी आपण सर्व जन या सहभागी होवून राष्ट्राची संपत्ती वाचवू.


गुरुवार, २४ मार्च, २०११

भारतीय संघाचे अभिनंदन

Add caption
 भारतीय संघाने आज ओस्ट्रेलिया संघाला रोमहर्षक सामन्यात नमवून सेमी फायनल मध्ये  प्रवेश केल्या बद्दल सर्व खेळाडूचे विशेषत: युवराज हार्दिक अभिनंदन.आज खेळताना सर्व जन भारतासाठी खेळताना दिसले.उत्तम क्षेत्ररक्षण,गोलंदाजी,आणि सवोत्तम फलंदाजी.भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू आज विजयासाठी खेळत होता.आजचा सामना भारतीय संघासाठी करो व मरो अशाच होता.आणि भारताने तीन वेळा विश्व कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारवली.

सोमवार, २१ मार्च, २०११

ती......... एक दुपार

                     रोहन सकाळी नेहमी प्रमाणे लवकर ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला.तशी वीणा ही स्वयंपाकाला लागली.त्याचे लग्न होऊन जेमतेम दहा दिवस झाले होते. आणि आज रोहन लग्नाच्या सुट्टी  नंतर पहिल्यांदाच ऑफिसला निघाला होता. रोहन पुण्याला शिक्षणा साठी आला होता.तिथेच त्याला नौकरी पण लागली.तो कामात हुशार असल्या मुळे त्याला प्रमोशन पण मिळून तो मैनेजेर झाला. आधी तो ऑफिस जवळ दोघा पार्टनर सोबत रूम घेऊन राहत होता पण लग्न ठरल्या मुळे तो स्वतंत्र फ्ल्याट भाड्याने राहण्या साठी शोधत होता. बरीच शोधाशोध केल्या नंतर त्याच्याच कंपनीतील एका मित्राच्या बहिणीचा हा फ्ल्याट होता.ती नागपूरला राहत होती तिने आपल्या मुलाला पुण्यात शिक्षण घेण्यासाठी राहण्या करिता घेतला होता.हा फ्ल्याट त्याला फक्त तीन-चार महिन्या साठी मिळाला होता.फ्यात तसा मुख्य वसती पासून लांब व आजूबाजूला फार कमी वस्ती होती आजूबाजूचे बांधकाम अजूनही अपूर्ण अवस्थेत होते ह्याच्या फ्ल्याट च्या इमारती मध्ये एक दोन कुटुंब्ये राहावयास आली होती ह्याचा फ्ल्याट पाचव्या मजल्यावर होता व त्याच्या आजूबाजूचे सर्व फ्ल्याट खाली होते व तिसर्या मजल्यावर श्री साने राहत होते.त्याच्या कडे मोजून पाच माणसे राहत होती. गावी जाण्याच्या दोन दिवस अगोदर त्याच्या ताब्यात मिळाला होता.

                 टेबलावर जेवताना त्याने वीणाला सांगितले कि मी ऑफिसला गेल्यावर एकदम दरवाजा उघडू नको प्रथम आलेला व्यक्ती कोण आहे या बाबत नीट विचारपूस कर.खात्री झाल्याशिवाय दार उघडू नको.पेटीमधील डाग दागिने नीट कपाटात ठेऊन कुलूप लाव. दुपारी जरा सावधपणे झोप.फार भीती वाटलीतर खाली साने कडे जावून ये.त्याच्या सारख्या सूचना देणे सुरु होते ती फक्त कहाणी ऐकावी तशी हो म्हणून मान डोलवित होती.मनातून ती फार घाबरत होती. कारण तिला लग्ना अगोदर घरी कधीच एकटी राहाचे काम पडले नाही. तिच्या माहेरी एकत्र कुटुंब पद्धती असल्या मुळे सतत घरात कोणी सोबतीला असायचे.आणि घरचे लोग पण तिला एकटे ठेवत नव्हते. त्यामुळे एकट राहण्याचा प्रसंग लाग्नाधी तिच्यावर आलाच नाही.हि पहिलीच वेळ असल्यामुळे ती मनातून खूप घाबरली होती पण ती चेहर्या वरून तसे त्याला समजू देत नव्हती.

                 त्याने आपली bag घेतली व तो खाली आला त्याने जाता जाता साने काकूला वीणा घरी एकटी असल्या मुळे जरा लक्ष ठेवण्याची विनंती करून तो ऑफिसला निघाला.इकडे वीणाने जरा सामानाची आवारावर केली.सर्व दारे खिडक्या बंद आहेत याची खात्री करून तीने मासिक वाचायला घेतले.काल रात्री प्रवासात झोप न झाल्यामुळे तिला मासिक वाचत असताना तिचा केव्हा डोळा लागला तिला समजले नाही.

                 काही वेळाने दोन चोर समोरच्या दाराचे कुलूप तोडून तिच्या घरात शिरले. ते आपापसात कुजबुजत होते.कारण त्यांना ह्या घरात कोणीच राहत नाही अशी माहिती मिळाली होती परंतु वीणाला एकटे घरात पाहून तेही घाबरले होते. त्यापैकी एकाने वीणाला झोपेतून जागे केले.समोर दोन अनोळखी इसम पाहून ती पण घाबरली.ती मोठयाने ओरडणार तितक्यात एकाने तिचे तोंड दाबले व जवळील मोठा चाकू काढून तिच्या गळ्याजवळ धरला .ते सारखे तिच्या जवळ किल्याची मागणी करू लागले.पण ती देण्यास तयार होत नव्हती.एकाने जबरीने तिच्या कानातले ओढले त्यामुळे कानातून रक्त वाहू लागले.तरी पण तिने काही चाब्या दिल्या नाहीत.परत त्याने हातावर चाकूने दोन-तीन वार केले.सगळ्या कपड्यावर रक्त वाहू लागले. शेवटी तिने कपाटाच्या चाब्या बेड रूम मधील पर्स मध्ये असल्याचे सांगितले.दोघानीपण तिला खाली ढकलून बेड रूम कडे आपला मोर्चा वळवला. ते दोन चोर आत गेल्याचे पाहून तिने बेड रूमचा दरवाजा बाहेरून लावून घेतला.दोन्ही चोर आत मध्ये कोंडले गेले. तिने लगेच रोहनला मोबाईल लावला व घडलेली घटना सागितली.त्याला हे सर्व समजल्यावर त्याने लगेच साने काकांना फोन केला व घरी जाण्यास सांगितले व तो घरी निघाला.सानेकाका लगेच वर आले व त्यांनी वीणाला धीर देवून पोलिसांना फोन लावला.थोड्यावेळाने पोलीस आले व त्या चोरांना ताब्यात घेऊन गेली.रोहन घरी आला.वीणाच्या कपड्यावरील व खाली सांडलेले रक्त पाहून त्याला घडलेला प्रसंग किती भयानक होता.याची जाणीव झाली.पण वीणा ने ज्या हिमतीने व हुशारीने आलेल्या प्रसंगाला तोंड दिले.या बद्दल  त्याने तिचे कौतुक पण केले.त्याने तिला ताबडतोब दवाखान्यात नेले. व काही दिवसाने तो फ्ल्याट त्याने सोडून दिला.

रविवार, २० मार्च, २०११

टीम इंडियाला हार्दिक शुभेछा......!

आज ब गटातील सामना दुपारी अडीच वाजता भारत विरुद्ध वेस्ट इंडीज ह्यांचात चेनई येथील एम ए चिदंबरम मैदानावर होणार आहे. आज रंग पंचमी असल्यामुळे सचिन आज शतकांचे शतक पूर्ण करण्यासाठी धावांची उधळण करणार आहे. चेनईची खेळपट्टी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायद्याची साबित होणार आहे.असे क्रिकेट च्या जाणकारांचे मत आहे. भारतीय संघ जरी दुखापतीने ग्रासला असला तरी सर्व संघ एकीने खेळेल.अशी आशा आहे.मिस्टर माहीने आधीच्या सामन्यात केलेल्या चुका परत करणार नाही यातून तो बराच काही शिकला आहे.असे त्याच्या बोलण्यावरून वाटते.विरू व्याधीग्रस्त असल्यामुळे रैना ला व जाहिरच्या सोबतीला अश्विन ला संधी मिळू शकते.तिकडे पाकिस्थान्ने कांगारुणा हरविल्या मुळे आजच्या सामन्याला विशेष महत्व आहे.नागपूरच्या पराभातून बाहेर पडण्यासाठी आज विजय हवाच.


गेल्या तीन चार दिवसात भारतीय संघाने चांगला सराव केला असून टीम मानसिक आणि शाररीक दृष्ट्या एकदम फीट आहे. भारताने जर प्रथम गोलंदाजी घेतली तर त्यांचे लक्ष पहिल्या दहा षटकात वेस्ट इंडीज च्या तीन विकेट घेण्य कडे पाहिजे.इतर खेळाडूंनी उत्तम क्षेत्ररक्षण करून एक एक धाव रोखली पाहिजे. दोन्ही संघाना आजचा सामना फार महत्वाचा आहे. त्याचाकडे गेल शिवाय इतर कोणी फार्मात नाही गेल ची विकेट भारताने लवकर घेतली पाहिजे. पाहू आता काय होते ते.

परत एकदा   टीम इंडियाला हार्दिक शुभेछा!


शनिवार, १९ मार्च, २०११

दानशूर कोण ?

                                                आज दुपारी बाजारातील जनरल स्टोअर्स मध्ये पेन विकत घेण्यासाठी गेलो.दुकानात गर्दी असल्यामुळे बराचवेळ प्रतीक्षा करावी लागली थोड्यावेळाने दुकान मालकाचे लक्ष माझ्याकडे गेले व तो म्हणाला, " काय पाहिजे? 
"मला एक चांगला पेन दाखवा." मी म्हणालो. 
व तो पेन आणायला आत गेला. 
                                          मी दुकानातील इतर वस्तू पाहत होतो.त्या दुकानात काचावर लावलेल्या एका सुविचारावर माझे लक्ष केंद्रित झाले. तो सुविचार होता. 
    ""जगामध्ये कर्णा पेक्षा मोठा दानी व्यक्ती कोण आहे? 
खालच्या ओळीवर लिहले होते 
"कंजूष व्यक्ती" कारण कि कंजूष व्यक्ती!
 आपले सर्व आयुष्य पै पै जोडण्या मध्ये घालवतो व शेवटी इतरांसाठी सर्व सोडून एकटाच निघून जातो.

                                               सदर सुविचार मी दोन तीन वेळा वाचला. तेवढ्यात दुकानदाराने माझ्या समोर सात आठ प्रकारचे पेन टाकले.त्यातील एक पेन मी निवडला व पैसे देऊन मी बाहेर पडलो. परंतु माझ्या मनातील तो कंजूस व्यक्ती काळी केल्या जात नव्हता. खरच एका बाजूने विचार केला तर आपण कमावलेला पैसा अडका त्याचा उपभोग आपण का नाही घ्यायचा.कशाला आपल्या पुढचा पिढीसाठी आपण पैसा कमवायचा.जसे देवाने पैसा कामवयासाठी   आपल्याला दोन हात दिले, तसे त्यानाही (पुढच्या पिढीला) पण दिले आहे या जगात तेही पैसा प्रतिष्ठा तेही कमावतील ज्याने तोंड दिले आहे तो घासही देईल. आजचा आलेला क्षण आपण जगायचं पुढच्या पिढीचे कोणी पहिले.

                                                नंतर लक्षात आले कि असाच जर विचार आपल्या आई वडिलांनी केला असता तर?, आपण लहान असताना आपल्याला तळहातावरील फोड प्रमाणे जपले.स्वताला परवडत नसताना देखील आपल्याला चांगल्या शाळेत शिकवले,आपल्या वर चांगले संस्कार आपल्याला चांगल्या समाज्याच्या लायक बनविले. जर त्यांनी आपल्याला चांगले शिक्षण दिले नसते तर आपण आज जे आहोत या पेक्षा खालचा दर्ज्यावर असतो.आपण आज जे काही आहोत ते त्यांनी  वेळोवेळी केलेल्या त्यागामुळेच.

                                                 वरील सुविचारातील कंजूस व्यक्ती प्रमाणात योग्य वाटते तरी पण आपल्या कमाई मधील पंचवीस टक्के रक्कम आपणावर खर्च करावी उर्वरित रक्कम पुढच्या पिढी साठी त्यांना फक्त अडी अडचणी मध्ये कामात येईल यासाठी ठेवावी.

बुधवार, १६ मार्च, २०११

पाणी व्यवस्थापन

उन्हाळा सुरु जाहला म्हणजे पाण्याची समस्या निर्माण होते. पाण्याचा वापर फार काटकसरीने करावा लागतो. कारण हिवाळ्याच्या शेवटी शेवटी विहिरी, बोअरवेल, नद्या,तलाव,धरणे आदी पाण्याचे साठे आटायला सुरवात होते. उन्हाळ्याचा सुरुवातीला याचा त्रास जाणवायला लागतो.नळाला येणारे पाणी फार जपून वापरावे लागते.या वेळी पाणी व्यवस्थापनची गरज वाटते.

पाण्याचे व्यवस्थापन पद्धतीचा वापर जर हिवाळ्याच्या सुरवाती पासून केला तर उन्हाळ्या मध्ये पाण्याची समस्या जरा कमी होते.कारण हिवाळ्याचा सुरवातीला नुकताच पावसाळा संपल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वर असते. पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे रेन हार्वेस्टिंग करावे म्हणजे पडणारे पाणी घरच्या बोअरवेल,विहीर जवळ खड्डा करून गच्चीवर सर्व पाणी त्यात कसे साठवता येईल याची व्यवस्था करावी. स्वयंपाक घरात वापरण्यात येणारे पाण्याचे व न्हाणी घराचे बाहेर पडणारे पाणी यांचे वेगवेगळे बाहेर काढावे. स्वयंपाक घरातील पाणी घरासमोरील लावलेल्या झाडांना द्यावे.न्हाणी घरातले पाणी सार्वजनिक नालीने बाहेर काढावे.

उन्हाळ्यांत कुलरचा वापर फक्त दुपारी करावा.रात्री अंगणात किंवा गच्चीवर झोपावे. अंगणातील झाडांची सावली दुपारनंतर घरावर येईल अश्या रीतीने झाडे लावावीत.

सोमवार, १४ मार्च, २०११

फरक सांगा?

बंड्याला शाळेत पेपर सोडवताना प्रश्न आला.
Guarantee आणि Warranty यातील फरक उदाहरणासह लिहा ?
आम्हाच्या बंड्याने खालील प्रमाणे या प्रश्नाचे उत्तर लिहिले.
Guarantee म्हणजे एखादी वस्तू जर दिलेल्या मुदती मध्ये खराब झाली तर त्या बदल्यात बदलून मिळते. 
आणि Warranty म्हणजे एखादी वस्तू जर दिलेल्या मुदती मध्ये खराब झाली तर, तीच वस्तू दुरुस्त करून परत वापरण्या योग्य करतात. आता उदाहरण द्यायचे झाल्यास, समजा लग्न झालेली मुलगी सासरी चांगली वागत नसेल तर तिच्या माहेरची मंडळी तिला समजावून सांगतात असे वागायचे नाही.सर्वांशी चांगली वाग वैगेरे वैगेरे............. सांगून तिची रवानगी सासरी करतात. तर हि झाली Warranty. 

आणि माहेरची मंडळी जावयाला म्हणतात जर ही मुलगी चांगली वागत नसेल तर हिच्या लहान बहिणीला घेऊन जा ही झाली Guarantee. 

रविवार, १३ मार्च, २०११

बाजार

खेडे गांवात दर आठवड्याला भरणाऱ्या बाजाराचे खूप महत्व आसते.कारण खेडे गावाचे आर्थिक व्यवहार शेतीतून निघणार्या मालावर अवलंबून असतात.शेतात धान्यासाबोत भाजीपाल्याचे पिक घेवून दर आठवड्याच्या बाजारात  विकून पैसा कमवायचा जोड धंदा शेतकरी करीत असतात. कारण भाजीपालाचे पिक हे नगदी पिक आहे. अश्याच एका गावातील शेतकर्याची ही कथा (व्यथा ) आहे.

आज सकाळी सदाशिव भल्या पहाटे उठला. सकाळचे कामे आटोपती घेऊन त्याने कालच शेतातून काढलेल्या भाजी पाल्याचे पोते बांधावयास घेतले.शेवंता त्याला त्याचा कामात मदत करीत होती. त्याची पोर अजून झोपेतच होती. सदाशिव एका यंत्रा प्रमाणे काम करीत होता, पण त्याच्या मनात दुसरेच विचार चालू होते. आज बाजारात भाजी विकून आलेल्या पैश्यामध्ये जवळचे काही पैसे घालून साकाराकडून वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेल्या ६०००० रुपये कर्जाचा शेवटचा हप्ता देवून त्याच्या कडे गहाण ठेवलेली दीड एकर शेती सोडवायची होती.परवाच सावकाराची माणसे येवून त्याला कर्जाच्या हप्त्या विषयी दम देवून गेली होती.  

या वर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे पीकही चांगले आणि भाजीपाला पिकला होता.त्याच्या वडिलांना कॅन्सर झाल्या मुले ऑपरेशन करावे लागले परंतु ते काही त्यातून वाचले नाही. आता सावकाराचे कर्ज कसे परत करायचे हा त्याच्या समोर प्रश्न होता.गेल्या दोन तीन हंगामात पावसाने दगा दिल्या मूळे शेतात पिक ही घरात खाण्यापुरतेच झाले.शेवंता पण मजुरी साठी दुसर्याच्या शेतात कामाला जात होती या परिस्थितीत कर्ज
 कसे फेडणार याच विवंचनेत तो होता या परीस्थित त्याला साथ दिली ती त्याचा मित्र दौलत ने.दौलतने त्याला शेतात विहीर खोदण्यासाठी सरकारच्या योजनेची माहिती सांगितली.व त्या साठी त्याने सदाला वेळोवेळी मदत पण केली. शेतात विहीर खोदल्या मूळे तो पिकाबरोबर भाजीपाला पण पिकवू लागला.व त्याने थोडे थोडे करून सावकाराचे कर्ज पण फेडत आणले आता शेवटचा हप्ता देऊन सावकाराच्या तावडीतून शेत सोडवायचे व एक बैलगाडी विकत घ्यायची  हा एकच विचार त्याच्या मनात होता. शेवन्ताच्या हाकेने तो भानावर आला.कारण बाहेर दौलत बाजारात घेवून जाण्यासाठी हाका मारीत होता.

त्याने भरभर सर्व पोते गाडीत टाकले व दोघेही तालुक्याच्या बाजारात जायला निघाले.शेवंता पण त्याच्या लहान होणाऱ्या आकृतीकडे बराचवेळ बघत बसली.तिलाही पण सावकाराच्या कर्जाची जाणीव होती. ती सर्वथाने सदाशिवाची साथ देत होती.गेल्या दोन वर्षापासून घरात त्यांनी दिवाळी पण खर्या आनंदाने साजरी केली नव्हती.

सदाशिव व दौलत दोघेही बाजारात पोहचले व आपापले दुकान लावण्यात मग्न होते. बाजार पण चांगला भरला.पाहता पाहता गर्दी चांगली वाढू लागली.नेहमी प्रमाणे इतर भाजीवाल्या पेक्षा सदाशिव चा माल चांगला व ताजा असल्यामुळे त्याच्या दुकानावर गिऱ्हाईकाची जरा जास्त गर्दी होती. 

सदाशिव गीर्हयीकाशी बोलत असतांना बझारच्या दिशेने काही लोक धावत येताना दिसले काही समजण्याच्या आत ते लोक बाजारातील भाजीपाला इतरस्त्र फेकू लागले व जोरजोराने बंद करा बंद करा अश्या घोषणा देवू लागले. पाहता पाहता ते लोक सदाशिव च्या दुकाना पर्यंत आले व त्याच्या दुकानातील रचलेली भाजी रस्त्यावर फेकू लागले. काही क्षणातच सर्व भाजीपाला रस्त्यावर फेकला.सदाशिवने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु जमावातील लोकांनी त्याला बेदम मारहाण केली.व ती निघून गेली पुढच्या दुकानाकडे .यात तो चांगलाच जखमी झाला.त्याला उठता पण येत नव्हते.व जखमी अवस्तेत तो रस्त्यावर पडलेल्या अस्ताव्यस्त पडलेल्या भाजी मध्ये त्याला सावकाराचा चेहरा, आपली शेती व बैलगाडी दिसू लागली.

शुक्रवार, ११ मार्च, २०११

सुसंगती सदा घडो

एक सुभाषित "सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो" आपल्याला जर चांगली संगत मिळाली तर आपले विचार चांगले होतात. बालपणा पासून आपल्याला चांगले मार्गदर्शन करणारे मित्र, शिक्षक, लोक भेटले तर त्यांच्या संगतीने आपल्याही आयुष्याचे भले होते.आपल्याला भेटणार्या माणसामध्ये चांगले वाईट गुण असतात.किंवा चांगल्या-वाईट गुणाचे प्रमाण कमी-अधिक असू शकते. त्या माणसामधील चांगले गुण हेरून त्याचा उपयोग आपल्या कसा होईल याचा विचार करावा या साठी शिक्षणाची गरज असते असे नाही याला पाहिजे व्यवहारी ज्ञान. 

सुसंगती बाबत फार पूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवते. जंगला मध्ये हिंडताना दोन मित्रांना एका पोपटाची दोन पिल्ये सापडतात.त्या दोघांचा व्यवसाय आसतो प्राण्याचे मांस विक्रीचा. त्या दोघा पैकी एकाने पिल्लू छान पिंजरा आणून आपल्या दुकानात ठेवले, व त्याला बोलायला शिकवू लागला ,तर दुसर्याने दुसरे पिल्लू देवळातील पुजार्याला देऊन टाकले.व तो आपल्या कामाला निघून गेला. पुजार्याने त्याला देवळाच्या गाभार्यातील पिंजर्या मध्ये ठेवून दिले. बराच काळ गेल्या नंतर तो जेव्हा देव दर्शनाला गेला तेव्हा त्याने पुजाऱ्या कडे पोपटा विषयी चौकशी केली. पुजार्याने त्याला सांगितले कि तुम्ही दिलेल्या पोपटाने मी म्हणतो ते सर्व मंत्र पाठ केले आहे. व तो माझ्या प्रमाणे दर्शनाला येणाऱ्या भक्तांची आदराने बोलतो. हे ऐकून त्याला फार आनंद झाला.व त्याने त्या पोपटाला चांगल्या माणसाच्या स्वाधीन करण्याचे सत्कृत्य केले या बाबत फार समाधान वाटले.

तसाच तो आपल्या मित्राला भेटायाला त्याच्या दुकानात गेला. तिथे गेल्यावर वेगळाच प्रकार त्याच्या लक्षात आला. त्या मित्राच्या दुकानातील पोपट रस्त्यावरून जाणार्या लोकांना शिव्या देत होता. दुकानात येणाऱ्या गीर्हयीकावर ओरडत होता. त्याला हे सर्व पाहून फार आश्चर्य वाटले कि एकाच पोपटाची हि दोन पिल्ये आहेत त्या पैकी एक जन शांत.सुस्वभावी सर्वांशी चांगला वागणारा आहे तर दुसरा स्वभावाने उग्र, शिव्या देणारा. हे पाहून त्याचे मन विचलित झाले. तो परत देवळात आला व त्याने झालेला प्रकार पुजार्याच्या कानावर घातला.

यावर पुजारी म्हणाला याला म्हणतात संगतीचा परिणाम.  एक जन देवळातील भजने, स्त्रोत्र -मंत्र एकूण तसे बोलू  लागला म्हणजे  चांगल्या लोकाच्या संगतीत राहून त्याने चांगले गुण घेतले या उलट दुसरे पिल्लू मित्राच्या दुकानात होते त्याचा व्यवसाय हा मांस विक्रीचा असून तो नेहमी त्याचं हात खालील लोकांना नेहमी शिव्या देऊन काम सांगायचा. त्या पोपटाच्या कानावर नेहमी अपशब्द पडत गेले. त्यामुळे त्या पिलाने ते लक्षात ठेवले.तर या पिल्ल्याचा कानावर नेहमी देवाचे नाव पडत होते त्याने ते लक्षात ठेवले.

म्हणून नेहमी चांगल्या लोकाच्या सहवासात राहावे.चांगल्या लोकांचा सहवास लाभल्या मुळे आपल्यालाही चार चांगल्या गोष्टी मिळतात.

गुरुवार, १० मार्च, २०११

काळ वेळ टाईम

आत्ताच्या क्षणाला आपण जगतोय, अनुभवतोय तो क्षण म्हणजे वेळ, काळ, टाईम. 
जगातील सर्वात बलवान कोणापुढे न झुकणारी, 
सर्वाना आपल्या मनाप्रमाणे वागवणारी, 
कोणालाही आपल्या पुढे जाऊ न देणारी,
सर्वाना एक समान वागणूक देणारी  
कोणासाठी न थांबणारी .......................

एकदा निघून गेलेली वेळ परत कधी येत नाही.किंवा ती परत आणता येत नाही.
प्रत्येक येणारा क्षण, वेळ हा शुभ असतो.केवळ त्या व्यक्तीचे विचार किंवा आचरण 
तिला शुभ किंवा अशुभ ठरवीत आसतात.दोन भिन्न व्यक्ती एकाच वेळी 
चांगल्या,वाईट प्रसंगाला सामोरे जात आसतात.एकाच गावात, शहरात,नगरात 
किंवा दोन शेजारी- शेजारी घरात एकाच वेळी चांगले वाईट प्रसंग घडतात.

तेव्हा आपण जीवनात आलेल्या प्रत्येक क्षण मध्ये आनंद शोधला पाहिजे.
कारण वाईट वेळ कायम राहत नाही.येणारा प्रत्येक क्षण आपल्याला 
नवीन अनुभव देऊन जातो.येणाऱ्या वाईट क्षणामध्ये भविष्यातील आनंद 
लपलेला आसतो.येणाऱ्या प्रत्येक क्षणाच सदुपयोग करून आपले जीवन सुखी करून घ्यावे.

मंगळवार, ८ मार्च, २०११

THE JOBS

This is the story about four people
named EVERYBODY, SOMEBODY, ANYBODY
and NOBODY.
There was an important job
to be done and
EVERYBODY was sure that
SOMEBODY would do it.
ANYBODY could have done it,
but NOBODY did it.
SOMEBODY got angry about that
because it was EVERYBODY job
EVERYBODY realized that EVERYBODY
would not do it. It ended up that
EVERYBODY blamed SOMEBODY
when actually accused ANYBODY.

ओळख

समाजात आपण वावरत असताना आपला संपर्क अनेक लोकांशी येत असतो, त्यातील सर्वच लोक आपल्या परिचयाची आसतात. असे नाही परंतु, ज्या लोकांशी आपला वारंवार संपर्क होता त्यांना आपण ओळखतो किंवा संबधित व्यक्ती आपल्याला ओळखते.कारण पहिले ओळख होते मग ओळखीचे रुपांतर मैत्रीत,नंतर नाते संबधात.
 
मानव नावाचा प्राणी जेव्हा जन्माला येतो, तेव्हा पासून त्याची ओळख पण जन्माला येते. मानव प्राण्याची पहिली ओळख म्हणजे पुरुष कि स्त्री नंतर अमक्याचा मुलगा किंवा मुलगी.नात किंवा नातू.वैगेरे ....

माणसाची ओळख निर्माण करण्यासाठी त्याचे शिक्षण व  त्याचा आजू बाजूं असलेला परिसर फार महत्वाचे काम करतो.काही लोकाच्या बाबती त्यांचे कार्य (कर्म) हि त्याची ओळख निर्माण करते.कारण त्यांनी केलेक्या सत्कार्मामुळे त्याची ओळख चिरकाल टिकते उदा. श्रीराम,श्रीकृष्ण,महाकवी कालिदास,तुलसीदास ई. हि झाली पुरातन उदाहरणे अलीकडच्य काळातील म्हणजे शिवाजी महाराज,स्वामी रामदास,संत तुकाराम असे अनेक नावे देता येतील कि ज्यांचे कर्म हीच त्यांची ओळख.

एकदा ओळख झाली कि त्याचा वापर स्वताच्या स्वार्थसाठी कसा करून घायचा या बाबतीत काही माणसे फार तरबेज असतात. आणि एकदा आपले काम झाले कि तू कोण अन मी कोण अशा व्यक्ती पासून सावधान राहिले पाहिजे. ओळखीचा वापर हा केवळ स्वार्थासाठी नाही तर समाजकारणा साठी झाला पाहिजे. 

रविवार, २७ फेब्रुवारी, २०११

डोक्याचा वापर

बंड्या एकदा कागद उडू नए म्हणून त्यावर ठेवायला जड़ वस्तु शोधत होता. 
तेवढ्यात त्याचे गुरूजी तेथे आले 
व त्याला म्हणाले :- अरे बंड्या काय शोधतोय ? 
बंड्या :- काही नाही सर कागदावर ठेवायला जड़ वस्तु शोधतोय!!.
गुरूजी :-सापडली काय? 
बंड्या :-नाहीना...... 
गुरूजी :-अरे मग डोक्याचा वापर कर ना.........

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

aaj sakali

फुलारे उघड उघड पाकळी
आज सकाळी बरोबर ५ वाजता जाग आली. पटकन आथरून सोडले सकाळचे प्रातविधी लवकर आटोपले व चहाचे अमृत घेऊन ५.३० वाजता फिरायला निघालो एकटाच. मुख्य रस्त्याला आल्यावर नेहमीचे लोक दिसले. त्याच्याशी राम राम झाल्यावर चालता चालता एक एक विषय निघू लागले म्हणजे राजकारणातील चालू घडामोडी  राजकारणातील राजकारण. तसं पहिलतर राजकारणात मला काही रस नाही. राजकारणातील माझा सहभाग फक्त  मतदाना पुरता कारण माझे स्पष्ट मत आहे कि आज काल जे राजकारणी लोक राजकारण करतात ते फक्त स्वार्थासाठी त्यांना ज्या समाजाने निवडून दिले त्या समाजाच्या भल्यासाठी नाही. जे पुढारी आपल्या स्वताच्या घरासमोरील  खांबावरील नगरपालिकेचा लाईट लावण्या मागे राजकारण करतात ते समाजाचे काय भले करू शकणार? असो
नंतर विषय निघाला तो काळ्या धनाचा! भारतातील लोकांनी जे विदेशामधील बँकामध्ये जो पैसा नेला त्याचा. खरतर इंग्रजांना जे करायला दीडशे वर्ष लागली ते भारतीय राजकारणी लोकांनी अवघ्या पन्नास वर्षात करून दाखविले त्यांनी काही हजार कोटी रुपये पन्नास वर्षात लुटून नेले हे जर पैसे भारतात परत आणले तर भारताची ओळख एक विकसित देश म्हणून जगाला होईल. प्रयत्न सुरु झाले आहेत पाहू काय होते ते कारण भारतीय राजकारणी लोकांचा अनुभव आपण गेले साठ वर्षे आपण घेत आहोत यांना निवडणुका आल्या कि सर्व विषय आठवतात. एकदा निवडून आल्यावर स्वार्थचे राजकारण करायचे असे वर्षानुवर्षे चालू आहे. 

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०११

माझा गांव

माझ गाव बुलडाणा

एक शांत शहर म्हणून याची ओळख.

फार पूर्वी येथे भिल्ल लोकांची वस्ती होती म्हणून याला भिल्लथाना म्हणत कालांतराने भिलथान्याचे बुलडाणा जाहले

सातपुड्याच्या कुशीत वसलेलं चारही बाजूनी हिरवे डोंगर 

या गावात ७५ टक्के सरकारी नौकारदार आहेत 

एके काळी हे गाव थंड हवेसाठी प्रसिद्ध होते परंतु आता गावाच्या भोवताली सिमेंटचे जंगल झाल्यामुळे व मोठ्याप्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे शहरात उष्णता जाणवते.

माझ्या गावात नौकारदार वर्ग असल्यामुळे जो तो आपापल्या कामात व्यस्त असतो बहुतेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर नौकारीतले शेवटची वर्ष यागावची निवड करून येथेच राहतात 

माझ्या गावात ना रेल्वे ना विमानतळ तरी या गावाची ओळख महाराष्ट्रात जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून आहे.

येथे सर्व जाती पंथाचे लोक राहतात राजकारणात हा मतदार संघ राखीव तरीही 

या माझ्या गावाची शैक्षणिक दृष्ट्या चांगली प्रगती झाली आहे एक वैद्यकिय शिक्षण सोडलेतर सर्वप्रकारचे तांत्रिक, अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची सोय येथे आहे 


सोमवार, १४ फेब्रुवारी, २०११

सूर्यनमस्कार

आज सकाळी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचायला मिळाली अमेरिकेत भारतीय सूर्यनमस्कार फार लोकप्रिय जहाले आहेत.तिथे  अनेक लोक आरोग्य लाभासाठी या प्राचीन भारतीय व्यायाम प्रकारचा फायदा घेत आहेत. तेथे एक हिन्दू स्वयंसेवी संघटनेने अमेरिकेतील ४० राज्यातील २२५ शहरामद्ये आयोजित शिबिरात जवळपास दहा हजार लोकानी आपली नावे नोंदवून घेतली पण आपल्याकडे म्हणजे भारतात या विषयी काहीच तलमल नहीं
माज्या माहिती प्रमाने फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या शाखेमद्ये शाश्त्रीय पध्तीने कसे करावयाचे हे शिकवते परन्तु आजकाल शाखेम्दये जाण्याचे टालले जाते सुर्यनामस्कराचे प्रसार रामदासस्वामिनी भारतभर केला त्यानी गावोगाव फिरून प्रत्येक गावात एकतरी मारोतीचे मंदिर असावे व त्यापुढे सूर्यनमस्कार काढावे सूर्य देवता ही शक्तिची वेवता आहे सूर्यनमस्कार काढून शक्तिची उपासना करावी हा त्यामागचा उद्धेश असावा. सूर्यनमस्कार म्हणजे ११ आसनाचा सुरेख मिलाप आहे.सकाळी सुर्योदयाच्या वेळी जर सूर्यनमस्कार काढले तर सर्वांगास व्यायाम होतो व दिवसभर ताजेतावाने व उत्साह राहतो.