रविवार, १३ मार्च, २०११

बाजार

खेडे गांवात दर आठवड्याला भरणाऱ्या बाजाराचे खूप महत्व आसते.कारण खेडे गावाचे आर्थिक व्यवहार शेतीतून निघणार्या मालावर अवलंबून असतात.शेतात धान्यासाबोत भाजीपाल्याचे पिक घेवून दर आठवड्याच्या बाजारात  विकून पैसा कमवायचा जोड धंदा शेतकरी करीत असतात. कारण भाजीपालाचे पिक हे नगदी पिक आहे. अश्याच एका गावातील शेतकर्याची ही कथा (व्यथा ) आहे.

आज सकाळी सदाशिव भल्या पहाटे उठला. सकाळचे कामे आटोपती घेऊन त्याने कालच शेतातून काढलेल्या भाजी पाल्याचे पोते बांधावयास घेतले.शेवंता त्याला त्याचा कामात मदत करीत होती. त्याची पोर अजून झोपेतच होती. सदाशिव एका यंत्रा प्रमाणे काम करीत होता, पण त्याच्या मनात दुसरेच विचार चालू होते. आज बाजारात भाजी विकून आलेल्या पैश्यामध्ये जवळचे काही पैसे घालून साकाराकडून वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेल्या ६०००० रुपये कर्जाचा शेवटचा हप्ता देवून त्याच्या कडे गहाण ठेवलेली दीड एकर शेती सोडवायची होती.परवाच सावकाराची माणसे येवून त्याला कर्जाच्या हप्त्या विषयी दम देवून गेली होती.  

या वर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे पीकही चांगले आणि भाजीपाला पिकला होता.त्याच्या वडिलांना कॅन्सर झाल्या मुले ऑपरेशन करावे लागले परंतु ते काही त्यातून वाचले नाही. आता सावकाराचे कर्ज कसे परत करायचे हा त्याच्या समोर प्रश्न होता.गेल्या दोन तीन हंगामात पावसाने दगा दिल्या मूळे शेतात पिक ही घरात खाण्यापुरतेच झाले.शेवंता पण मजुरी साठी दुसर्याच्या शेतात कामाला जात होती या परिस्थितीत कर्ज
 कसे फेडणार याच विवंचनेत तो होता या परीस्थित त्याला साथ दिली ती त्याचा मित्र दौलत ने.दौलतने त्याला शेतात विहीर खोदण्यासाठी सरकारच्या योजनेची माहिती सांगितली.व त्या साठी त्याने सदाला वेळोवेळी मदत पण केली. शेतात विहीर खोदल्या मूळे तो पिकाबरोबर भाजीपाला पण पिकवू लागला.व त्याने थोडे थोडे करून सावकाराचे कर्ज पण फेडत आणले आता शेवटचा हप्ता देऊन सावकाराच्या तावडीतून शेत सोडवायचे व एक बैलगाडी विकत घ्यायची  हा एकच विचार त्याच्या मनात होता. शेवन्ताच्या हाकेने तो भानावर आला.कारण बाहेर दौलत बाजारात घेवून जाण्यासाठी हाका मारीत होता.

त्याने भरभर सर्व पोते गाडीत टाकले व दोघेही तालुक्याच्या बाजारात जायला निघाले.शेवंता पण त्याच्या लहान होणाऱ्या आकृतीकडे बराचवेळ बघत बसली.तिलाही पण सावकाराच्या कर्जाची जाणीव होती. ती सर्वथाने सदाशिवाची साथ देत होती.गेल्या दोन वर्षापासून घरात त्यांनी दिवाळी पण खर्या आनंदाने साजरी केली नव्हती.

सदाशिव व दौलत दोघेही बाजारात पोहचले व आपापले दुकान लावण्यात मग्न होते. बाजार पण चांगला भरला.पाहता पाहता गर्दी चांगली वाढू लागली.नेहमी प्रमाणे इतर भाजीवाल्या पेक्षा सदाशिव चा माल चांगला व ताजा असल्यामुळे त्याच्या दुकानावर गिऱ्हाईकाची जरा जास्त गर्दी होती. 

सदाशिव गीर्हयीकाशी बोलत असतांना बझारच्या दिशेने काही लोक धावत येताना दिसले काही समजण्याच्या आत ते लोक बाजारातील भाजीपाला इतरस्त्र फेकू लागले व जोरजोराने बंद करा बंद करा अश्या घोषणा देवू लागले. पाहता पाहता ते लोक सदाशिव च्या दुकाना पर्यंत आले व त्याच्या दुकानातील रचलेली भाजी रस्त्यावर फेकू लागले. काही क्षणातच सर्व भाजीपाला रस्त्यावर फेकला.सदाशिवने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु जमावातील लोकांनी त्याला बेदम मारहाण केली.व ती निघून गेली पुढच्या दुकानाकडे .यात तो चांगलाच जखमी झाला.त्याला उठता पण येत नव्हते.व जखमी अवस्तेत तो रस्त्यावर पडलेल्या अस्ताव्यस्त पडलेल्या भाजी मध्ये त्याला सावकाराचा चेहरा, आपली शेती व बैलगाडी दिसू लागली.

1 टिप्पणी:

  1. पुढे काय होता
    सावकार त्याचा शेत जप्त करतो का ....??
    त्याच्या बैलगाडीच स्वप्ना पूर्ण होता का...??

    उत्तर द्याहटवा