रविवार, २४ एप्रिल, २०११

अजब भिकारी

 भिकारी म्हटला कि, फाटके मळके कपडे घातलेली,ओबड-धोबड चेहऱ्याची कितीही नाही म्हंटले तरी तुमचा पिछ्या न सोडणारी लोचट व्यक्ती डोळ्या समोर उभी राहते.रस्त्याने,स्टेशन च्या बाहेर,बस स्थानक,देवळा जवळ हमखास दिसते.कारण त्यांना माहित असते कि माणसाच्या मनात श्रद्धा,दया करूणा भरलेली आहे आणि माणसाची हीच वृत्ती त्याला भिक देण्यासाठी मजबूर करीत असते.


मुंबईच्या या भिकार्यांच्या जीवनावर एक "ट्राफिक सिग्नल" नावाचा चित्रपट सुद्धा निघाला आहे.अश्या या भिकारी संबंधी लोकमत या वृत्तपत्रात एक बातमी वाचण्यात आली. या बातमी नुसार एकट्या मुंबई मध्ये आज साडे तीन लाखाच्या वर भिकारी आहे.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात यांची संख्या तेवढीच आहे. आणि ती वाढत्या बेकारीमुळे वाढतच आहे.कारण भिक मागणे हा बिन भांडवलीचा धंदा आहे.तस पाहीलेतर भिकारी हा शासनाच्या दृष्टीने दुर्लक्षित घटक आहे.त्याला ह्या व्यवसायापासून परावृत्त करण्या साठी शासनाजवळ कोणत्याही ठोस योजना नाही.


भिकार्याच्या मालमत्ते विषयीची माहिती जेव्हा शासना समोर आली तेव्हा अनेकांनी तोंडात बोटे घातली.मुंबईतील एकूण भिकाऱ्या पैकी काही भिकारी श्रीमंत असून त्यांच्या नावावर मुंबईत फ्ल्याट आहेत तर काहींच्या नावाने बँकेत लाखोंच्या ठेवी आहेत.काही भिकारी तर उच्यविद्याविभूषित आहे त्यांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला आहे.काहींच्या तर पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करीत आहे.हा असा एक धंदा आहे कि ज्या मध्ये कोणताही कर द्यावा लागत नाही.मिळणारे उत्पन्न हे करमुक्त असल्या मुळे त्याचा हिशोब ठेवावा लागत नाही.एकट्या मुंबईत भिकार्याच्या  पैश्याची वार्षिक उलाढाल एकशे ऐंशी कोटीच्या पेक्ष्या जास्त आहे. तुम्हाला रस्त्याने जाताना एखाद्या भिकार्याने भिक मागितली तर त्याला पैसे देताना नीट विचार करा कि, तुम्ही ज्याला भिक देत आहात तो कदाचित तुमच्या पेक्षाही श्रीमंत असू शकतो. नाही का? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा