रविवार, २४ एप्रिल, २०११

अजब भिकारी

 भिकारी म्हटला कि, फाटके मळके कपडे घातलेली,ओबड-धोबड चेहऱ्याची कितीही नाही म्हंटले तरी तुमचा पिछ्या न सोडणारी लोचट व्यक्ती डोळ्या समोर उभी राहते.रस्त्याने,स्टेशन च्या बाहेर,बस स्थानक,देवळा जवळ हमखास दिसते.कारण त्यांना माहित असते कि माणसाच्या मनात श्रद्धा,दया करूणा भरलेली आहे आणि माणसाची हीच वृत्ती त्याला भिक देण्यासाठी मजबूर करीत असते.


मुंबईच्या या भिकार्यांच्या जीवनावर एक "ट्राफिक सिग्नल" नावाचा चित्रपट सुद्धा निघाला आहे.अश्या या भिकारी संबंधी लोकमत या वृत्तपत्रात एक बातमी वाचण्यात आली. या बातमी नुसार एकट्या मुंबई मध्ये आज साडे तीन लाखाच्या वर भिकारी आहे.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात यांची संख्या तेवढीच आहे. आणि ती वाढत्या बेकारीमुळे वाढतच आहे.कारण भिक मागणे हा बिन भांडवलीचा धंदा आहे.तस पाहीलेतर भिकारी हा शासनाच्या दृष्टीने दुर्लक्षित घटक आहे.त्याला ह्या व्यवसायापासून परावृत्त करण्या साठी शासनाजवळ कोणत्याही ठोस योजना नाही.


भिकार्याच्या मालमत्ते विषयीची माहिती जेव्हा शासना समोर आली तेव्हा अनेकांनी तोंडात बोटे घातली.मुंबईतील एकूण भिकाऱ्या पैकी काही भिकारी श्रीमंत असून त्यांच्या नावावर मुंबईत फ्ल्याट आहेत तर काहींच्या नावाने बँकेत लाखोंच्या ठेवी आहेत.काही भिकारी तर उच्यविद्याविभूषित आहे त्यांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला आहे.काहींच्या तर पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करीत आहे.हा असा एक धंदा आहे कि ज्या मध्ये कोणताही कर द्यावा लागत नाही.मिळणारे उत्पन्न हे करमुक्त असल्या मुळे त्याचा हिशोब ठेवावा लागत नाही.एकट्या मुंबईत भिकार्याच्या  पैश्याची वार्षिक उलाढाल एकशे ऐंशी कोटीच्या पेक्ष्या जास्त आहे. तुम्हाला रस्त्याने जाताना एखाद्या भिकार्याने भिक मागितली तर त्याला पैसे देताना नीट विचार करा कि, तुम्ही ज्याला भिक देत आहात तो कदाचित तुमच्या पेक्षाही श्रीमंत असू शकतो. नाही का? 

शनिवार, १६ एप्रिल, २०११

रामदेव बाबा इकडे पण लक्ष द्या

विदेशामध्ये असलेला भारतीयांचा (?) काळा पैसा आणण्यासाठी बाबा रामदेव भारतभर आंदोलनात अग्रेसर आहे. त्याला माझा पूर्ण पाठींबा आहे.जसा हा पैसा भारतात एक दिवस नक्की येईल.

पण भारतातील अनेक मोठया देवस्थाना जवळ असलेला अमाप संपती आहे.ह्या देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न एका राज्याच्या उत्पनापेक्ष्या निश्चित जास्त आहे.भारतीय लोक दैववादी आहे देवाला मानणारे आहे. आपल्या उत्पन्नातील काही भाग देवाला अर्पण करावा,किंवा दान धर्म केल्याने पुण्य मिळते. असे संस्कार त्याच्यावर झालेले असतात. तेव्हा ते त्यांना जमेल तितका हिस्सा देवाला म्हणजे देवाच्या नावाने तयार झालेल्या संस्थानाला दान देत असतात. याच कृतीतून जितका देवाचा प्रकोप जास्त तितके त्याच्या नावाने तयार झालेल्या देवस्थानाला उत्पन जास्त.परंतु गेल्या काही दशकात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळल्या मुले लोकांचे उत्पन्न पण वाढले. आणि पाप लागू नये म्हणून दानधर्माच्या रकमेतही वाढ झाली.यामुळे देवस्थानच्या उत्पनात वाढ झाली.या संस्थांच्या नावावर त्यांच्या पिढ्यानपिढ्या जगू लागल्या व संस्थानावर आपलेच वर्चस्व राहावे या साठी घाणरडे राजकारण सुरु झाले.भारतात जितके कठोर कायदे आहेत पण तितक्या पळवाटा पण आहे असे संस्थानिक मोठमोठ्या कायदे पंडितांची फौज बाळगून असतात.त्यामुळे त्याच्या वर कोणी आरोप केले तर ते या कायदे पंडितांच्या मदतीने सहज आरोपातून मोकळे होतात. सरकारही त्यांच्या भानगडीत पडत नाही.

भ्रष्ट मार्गाने येणारा पैसा त्याचा सोबत पाप ही घेऊन येतो. या पापाचा आपल्या कुटुंबावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून हे लोक नेहमी दान करीत असतात.कारण त्यांचा समज असतो कि दान केल्याने पाप कमी होते.
दान देणाऱ्या मध्ये सर्वात आघाडीवर राजकारणी, मोठया हुद्दयाचे, श्रीमंत  लोक असतात.त्यांचीच चर्चा सर्वत्र होत असते. किंवा  हे लोक अश्या प्रकारच्या बातम्या स्वत छापून आणतात.स्वताचा उदोउदो करून घेतात. आणि आपणही अश्या बातम्या मोठया चवीने वाचतो.आपण कधी हा विचार करत नाही, ह्या व्यक्तीजवळ इतका पैसा कोठून व कसा आला? आपण फक्त त्याने केलेल्या दानाबद्दल दिवसभर चर्चा करीत बसतो.एखाद्या गरिबाने मेहनतीने कमाविलेल्या धनातून काही देवाला दान दिलेतर त्याची कोठे उल्लेखही होत नाही. देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. तो तर सर्वांचा निर्माता आहे त्याच्या जवळ कश्याचीच कमी नाही.

 देवस्थाना जवळ असणारा पैसा हा जर त्या भागातील लोक विकास, शिक्षण या साठी वापरला तर देशातून गरिबी नावाची वस्तू लवकरच नाहीशी होईल. अश्या संस्थानाच्या वर्षानुवर्षे पडून असलेली कोट्यावधी रुपयाची संपती मोकळी करण्या साठी बाबा रामदेव यांनी त्यांच्या नवीन पक्ष्या तर्फे आंदोलन सुरु करावे.कारण  भारतातील हा पडून असलेला पैसा भारताच्या विकासासाठी वापरणे तितकेच गरजेचे आहे जितका परदेशातील   पैसा भारतात आणणे. नाही का ? 

मंगळवार, १२ एप्रिल, २०११

शेम वाटसन

सध्या ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेश चा दौरा सुरु आहे.बांगला देश्याशी परवा झालेल्या सामन्यात वाटसन ने म्हणे पंच्यानाव चेंडूत एकशे पंच्यांशी धावा काढल्या.विश्व चषकातील झालेल्या पराभव व त्यामुळे झालेली मानहानी तीन वेळा विश्व विजेते पद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी फार जिव्हारी लागले आणि अश्या मानसिक अवस्थेमध्ये असताना विश्व क्रिकेट क्षेत्रात फारसा अनुभव नसणाऱ्या बांगला देश्याच्या क्रिकेट टीमशी त्यांचा सामना झाला.हे म्हणजे असे झाले बबर शेर, आधीच भुकेला त्यात त्याच्या समोर गरीब बिचारी शेळी आली तर तो तिचा फडश्या पडणारच. 


विक्रम करताना तो भारत,श्रीलंका,इंग्लंड,दक्षिण आफ्रिका सारख्या अनुभवी देशा विरुद्ध खेळताना झाला तर त्याचे महत्व अधिक असते.बांगला देशाची क्रिकेट टीम नवीन असून त्यांच्या खेळाडूना आंतर्राष्टीय सामना खेळण्याचे जास्त अनुभव नाही. अश्यातच त्यांचा सामना विजयासाठी चवताळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी झाला.मग विक्रम होणारच.त्यात काय नवल.उलट आमच्या सचिन तेंडूलकर ने सन २०१० मध्ये क्रिकेट क्षेत्रात बलाढ्य समजल्या जाणार्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नाबाद २०० धावा काढल्या आहेत हा विक्रम तोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाची पुढची पिढी जन्माला यावी लागेल. 


ऑस्ट्रेलियाचा जेष्ठ खेळाडू हेडन याने सन २००७ साली न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक १८१ धावा काढल्या होत्या.स्वताच्या खेळाडूचा विक्रम मोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाला चार वर्ष लागली सचिनचा नाबाद २०० धावांचा विक्रम मोडण्यासाठी अजून काही वर्ष त्यांना वाट पहावी लागणार हे मात्र खरे.

शनिवार, ९ एप्रिल, २०११

अशी आपली बायको असावी

आज सायंकाळी माझा इनबॉक्स उघडला असता मित्राने पाठविलेला बायको विषयीचा एक सुंदर पण विनोदी स्वरूपाचा इमेल दिसला. तो ब्लॉग वाचकांसाठी देत आहे.तस पहिले तर ऐंशी टक्के नवरोबाची आपल्या सहचारणी विषयी हीच अपेक्षा असते.म्हणूनच त्यांना दुसर्याची बायको नेहमी सुंदर दिसते.आपल्याही बायको मध्ये चांगले सद्गुण शोधा म्हणजे ती (स्वतःची) बायको पण वागणुकीने सुंदर वाटेल.

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

उपोषण लोकशाहीतील एक जालीम हथियार

                             भारताच्या राजधानी मध्ये जनालोकपाल विध्येयाकासाठी जंतर मंतर चौकात अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला देशभरातून व सर्व स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याला जनांदोलनाचे स्वरूप प्राप्त होत आहे.सायंकाळच्या बातमीपत्रानुसार सरकारने अण्णाच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या असून उपोषण संपण्याच्या अंतिम टप्यात आहे.

                             भारताने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे म्हणजे, "लोकांनी,लोकांतर्फे लोकांसाठी चालवलेली शासन व्यवस्था." ही व्यवस्था ज्या लोकांच्या हातात असते, त्या लोकांना त्याची मस्ती चढते ही चढलेली मस्ती उतरविण्याचे काम उपोषण नावाचे हथियार करीत असते.ह्या हत्याराचा वापर महात्मा गांधी यांनी फार चांगला केला.आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.किंवा शासनावर वचक,अंकुश ठेवण्याचे काम लोकांचे उपोषण करीत असते. उपोषण करण्याचा तुमचा हेतू जर लोक कल्याणाचा असेल तर त्याला विविध क्षेत्रातून पाठींबा मिळत जातो. शासनातील राजकारणी लोक जर शासन व्यवस्थेचा वापर जर स्वतःच्या स्वार्थासाठी करीत असतील तर त्यांना लोकांनी उपोषणाचा वापर करून समज दिली आहे.हे आपण कित्येक वेळा पहिले आहे.जगात प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते.कोणत्याही प्रकारची हिंसा न करता जगातील सर्व समस्या सोडवता येतात असा महात्मा गांधी चा विश्वास होता. आणि ह्याचा प्रत्यय त्यांनी अनेकदा आणून दिला.पण तत्कालीन स्वार्थी राजकारण्यांनी त्याचा घात केला.

                             आम्ह्च्या शहरात एक चौक आहे.त्या चौकात दर हप्त्याला कोणींकोनी कसल्या तरी कारणासाठी उपोषणाला तंबू लावून बसलेला असतो.आम्ही त्या चौकाला उपोषण चौक म्हणतो.देशातील सर्व स्तरातील लोकांना शासन दरबारी शासकीय कामासाठी जावे लागते.आज काल सर्व सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार बोलकावलेला आहे अधिकारी वर्गाला टेबला खालून पैसे दिल्या शिवाय ते काम करीत नाही.ज्यांच्या जवळ पैसा आहे त्याची कामे ही लोक पटापट करतात पण हातावर जीवन जगणाऱ्या गरिबाच्या कामाचे काय? तेंव्हा त्यांना आपले काम करून घेण्यासाठी उपोषण नावाच्या हत्याराचा वापर करावा लागतो. 

                             तेंव्हा अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या लढयामध्ये आपणही आपल्याला जमेल त्या मार्गाने सहभागी होवू.व महात्मा गांधीनी दिलेल्या अनोख्या शस्त्राचा वापर या पुढे शासनावर अंकुश ठेवण्यासाठी करू. 
                                                                          \\जय हिंद\\ 

बुधवार, ६ एप्रिल, २०११

गुरु ग्यारी बाय बाय

'टीम इंडियाला विश्व विजेता बनण्यासाठी मार्गदर्शन करणारे भारतीय संघाचे प्रशिक्षक Gary Kristen  आज आपल्या देशी परत गेले. त्यांनी गेल्या तीन चार वर्षापासून भारतीय संघाच्या केवळ खेळाकडेच लक्ष दिले नाही, तर मनोबल वाढवून विपरीत परिस्थितीत कसे एकसंघ राहून खेळायचे हे शिकवले. त्यांचा मार्गदर्शना खाली भारतीय संघाने फलंदाजी,गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्र रक्षण या बाबत प्रशिक्षण घेतले. त्यांनी खेळाडूला मैदानात व मैदाना बाहेर कसे वागावे याचे सल्ले दिले.त्यांनी संघाची विजयाची गती कायम ठेवणे हि प्रशिक्षका साठी एक मोठे आव्हान असते. मग कसोटी सामने असो कि २०-२० किंवा एकदिवसीय सामने सर्व मध्ये भारतीय टीमची कामगिरी सर्व श्रेष्ठ राहिली.भारतीय संघाने पण त्यांना सर्वोतपरी मदत केली.''  तेव्हा परत एकदा त्याचे आभार.    

मंगळवार, ५ एप्रिल, २०११

इतर खेळांना पण राजाश्रय मिळाला पाहिजे...

  भारताने २८ वर्षानंतर क्रिकेट चा विश्व चषक मिळवला त्याबद्दल सर्व खेळाडूचे हार्दिक अभिनंदन.......
 भारताचा तिरंगा क्रिकेटच्या विश्वामध्ये अभिमानाने फडकविणार्या खेळाडूवर सगळीकडून अभिनंदनाचा व बक्षिसाचा वर्षाव होत आहे.आयसीसी कडून भारतीय संघाला १३.२० कोटी रुपये तर बीसीसीआय ने प्रत्येक खेळाडूला एक एक कोटी रुपयाचे बक्षीस मिळणार आहे.महाराष्ट्र सरकारही एक एक कोटी रुपये देणार आहे.कर्नाटक सरकार प्रत्येक खेळाडूंना एक भूखंड देणार आहे, दिल्ली सरकारही एक एक कोटी रुपये देणार आहे. म्हणजे भारतीय संघामध्ये ज्या ज्या राज्याचे खेळाडू आहे ती ती राज्ये त्यांना बक्षीस देणार आहे.अश्या रीतीने प्रत्येक खेळाडू मालामाल होणार आहे.

सरकार कडे जमा होणाऱ्या पैश्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे कर,उपकर. हा पैसा जनतेने आपल्या उत्पन्नातून व्यवहारातून कराच्या स्वरुपात शासन दरबारी जमा केला असतो.शासन या पैश्याचा वापर जनतेला सुखसुविधा,सुरक्षा पुरवण्या नवनवीन योजना साठी व शासनाचा खर्च भागविण्या साठी करीत असते.परंतु अश्या प्रकारची खेळाडूना मोठमोठ्या रकमेची बक्षिसे देण्याचा अधिकार शासनाला आहे काय?.खर तर खेळाच्या तिकीट विक्रीतून जमा होणाऱ्या उत्पन्नातून बक्षिसे देणे हे योग्य आहे. 

शासनाने हा पैसा राज्यातील इतर नवोदित खेळाडूना त्यांचा खेळ सुधारण्यासाठी,त्यांना त्यांच्या खेळासाठी आवश्यक असणारी आधुनिक साधने, नवीन मैदाने खेळाविषयी इतर सवलती आदी साठी वापरला तर क्रिकेट शिवाय इतर खेळातही आपला देश नाव कमवील. ओलम्पिक मध्ये आपला देश पहिल्या दहा मध्ये पण नसतो. एखाद दोन खेळात चांगली कामगिरी सोडलीतर बाकीच्या खेळात आपले खेळाडू इतर देशांच्या तुलनेत तग धरू शकत नाही..चीन,जपान, उत्तर कोरिया सारख्या देशात खेळांना अधिक महत्व दिले जाते. तेथील सरकार त्यांच्या देश्यातील तरुणांना खेळात चांगल्या सुविधा उपलब्द करून प्रोत्साहन देतात.म्हणून त्याचे खेळाडू सर्व प्रकारच्या खेळात अग्रेसर राहतात.

आपल्या कडे एक किकेटचा खेळ सोडला तर हॉकी,कब्बडी,फुटबॉल,रानिग भारतीय परंपरागत खेळ या इतर खेळामध्ये कोणी क्यारिअर म्हणून पाहत नाही याचे मुख्य कारण म्हणजे ह्या खेळात नाव कमविले तरी खेळाडूला जास्त पैसा मिळत नाही.किंवा त्याचे नाव कायमचे लोकांच्या ध्यानात राहत नाही.पण क्रिकेट मध्ये एक जरी सामना एखद्या खेळाडूने खेळला तर त्याचे नाव लोक विसरत नाही.क्रिकेट मुळे त्याला फार प्रसिद्धी मिळते.व तो लोकांच्या कायम मनात राहतो.एकूण काय इतर खेलापेक्ष्या क्रिकेट मध्ये फार पैसा व प्रसिद्धी आहे.

तेव्हा क्रिकेट ला जास्त महत्व न देता इतर खेळ कसे लोकप्रिय होतील व त्या मध्ये नव नवीन खेळाडू कसे तयार होतील या साठी शासनाने नवीन क्रीडा विषयीचे धोरण ठरवून त्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. इतर खेळातील खेळाडूंना सर्वच स्तरातून प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. जसा क्रिकेटला राजाश्रय मिळाला तसा इतर खेळला पण मिळाला पाहिजे.इतकी इच्छा आहे.