सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

नुतनवर्शभिनन्दन





नवीन वर्षं आपणा सर्वाना 
सुख समृद्धीचे, 
उत्तम आरोग्याचे, 
यश किर्तीचे जावो 
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
आपल्या सर्व इच्छया 
येणाऱ्या वर्षात पूर्ण होवोत  

बुधवार, ५ डिसेंबर, २०१२

सूर गवसला

आज पासून सुरु झालेल्या तीसऱ्या कसोटी सामन्यात
पाहिल्या दिवसी सचिन तेंडुलकर ने पन्नास च्या वर
धावा केल्या आपण असे समजूया कि त्याला क्रिकेट
मधला सूर सापडला. आता त्याने असेच खेळत राहावे
आणि आपल्या bat ने सर्वांची तोंडे बंद करावी  

बुधवार, ४ एप्रिल, २०१२

उपाधी आणि कर्तुत्व

                               आज कोणते तरी दैनिक वाचत असताना एक बातमी वाचावयास मिळाली लखनो येथील १२ वर्षाच्या मुलीने पंतप्रधान कार्यालयाकडे महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता घोषित केल्या बाबतचा पुरावा दाखविण्या ची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली. यावर सरकारने उत्तर दिले कि या बाबत सरकारकडे काही पुरावा उपलब्द नाही. 

                                महात्मा गांधी यांचे संपूर्ण जीवन हे देश घडविण्याचा साठी व देश्यासाठी अर्पण केले. हे सर्व जगाला माहित आहे. माझ्या माहिती प्रमाणे महात्मा गांधीना सर्व प्रथम राष्ट्रपिता नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संबोधिले व महात्मा हि उपाधी रबिन्द्रनाथ टागोर यांनी दिली. 

                                 काही शब्द हे त्या व्यक्तीचे कर्तुत्व दर्शवितात जसे छत्रपती हा शब्द उच्चारला कि त्यानंतर शिवाजी महाराजांचे नाव येते.आणखी उदाहरणे द्यावयाची झाल्यास ती पुढील प्रमाणे देता येतील 

मर्यादापुरुषोत्तम श्रीराम,
 राजर्षी शाहू महाराज, 
धर्मवीर संभाजी राजे,
महर्षी धोंडो केशव कर्वे, 
लोकमान्य बाल गंगाधर टिळक, 
समाजसुधारक आगरकर,
आचार्य अत्रे,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, 

अगदी अलीकडील काळातील उदाहरणे म्हणजे 

महानायक अमिताभ बच्चन,
गानकोकिला लता मंगेशकर 

                                        सांगायचे तात्पर्य इतकेच कि ज्याच्या त्याचा कर्तुत्वामुळे त्याला समाज ओळखतो आणि तश्या उपाध्या ह्या देत असतो या बाबत कुठेही लेखी पुरावा आढळत नाही आणि सापडनारही नाही.अश्या प्रकारची माहिती मागून माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग कोणी करू नये. कारण माहितीचा अधिकार हे एक शस्त्र आहे हे कोठेही वापरून त्याची धार बोथट करू नये 
 

मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

मला आवडनारी तीन गाणी

 स्व. महमद रफ़ी, किशोर कुमार, मुकेश,  यानी गायलेली गाणी मला फार आवडतात  मलाच काय सर्वांना आवडतात पाहिले गाने म्हणजे  हम दोनों या चित्रपटातील " मैं जिन्दगी का साथ निभाता चला गया" हे गाण मी आता पर्यंत एकले असेल मला माहित नाही पण जेव्हा मी हे गाण एकतो तेव्हा असे वाटते की आपण हे पहिल्यांदा एकतो आहे


































आणि दुसरे गाने म्हणजे
































अजुन एक गायक मुकेश  यांचे आनंद या चित्रपटातील " मैंने तेरे लिए ही सातरंग के सपने चुने " हे  गाने एकताना मूड असा काही लागतो की बस







गुरुवार, २९ मार्च, २०१२

निबंध

 वर्गात एकदा सरांनी " मी कंपनीचा मनेजर झालो तर" 

या विषयावर एक निबंध लिहावयास सांगितला. 

सगळे विद्यार्थी लहावयास लागले.
 
बंड्या मात्र नुसता बसून होता. 

त्याला सरांनी विचारले.......

 " कारे लिहित का नाही आहेस?"

 त्यावर बंड्या शांतपणे म्हणाला 

" सर मी माझ्या सेक्रेटरीची वाट पाहत आहे."

मंगळवार, २७ मार्च, २०१२

हजरजवाबी

एकदा पत्नि पतीला म्हणाली

घरातली भाजी संपली 


बाजारात जाऊन भाजी आणा.


पती म्हणाला 


बाजारात कश्याला  जायला पाहिजे 


स्वताच्या डोक्यातले बटाटे काढ ना. 


आणि त्याची भाजी कर.


 त्यावर पत्नी चटकन म्हणाली 


बर तुम्ह्च्या डोक्यातले कांदे द्या 


ते पण त्यात घालते चवीला .
  

बुधवार, १४ मार्च, २०१२

असं का ?

देवाचे वास्तव्य सगळी कडे आहे हे सर्व मान्य आहे.


मग समाजात वावरताना आपण पाहतो 


कि काही लोकांमध्ये त्यांची लायीकी नसताना 


ते समाजाचे नेतृत्व करतात, किंवा मोठ्या पदावर असतात 

आणि काही लोक लायक, सर्वगुण संपन्न असून

ते अश्या लोकांना साह्य करताना दिसतात