भारताची गुप्तचर यंत्रणेचा दर्जा फारच ढासळत चालला आहे. हे पुन्हा एकदा सरकारने भारतीयांना दाखवून दिले आहे. भारतावर जे अतिरेक्यांनी हल्ये केले,बॉम्बस्पोट घडवून आणले किंवा यात सहभागी असलेले फरार दहशतवादी याची यादी भारत सरकारने शेजारच्या राष्ट्राला सदर केली.या यादीत समाविष्ट असलेला वझुर कमर खान हा दहशतवादी मुंबईतच गेल्या अनेक वर्षापासून राहत आहे याची भारतीय गुप्तचर यंत्रणेला व सरकारला माहिती नाही.यावरून हे लक्षात येतेकी भारतीय गुप्तचर यंत्रणा किती सुस्त झाली.आहे.वझुर कमर हा सन २००३ मध्ये मुलुंड येथे झालेल्या रेल्वे बॉम्बस्पोटातील आरोपी आहे. त्याची जामिनावर सुटका झाली आहे.
हा प्रकार जेव्हा मिडीयाने उघडकीस आणला. तेव्हा सरकारला जग आली. या वर भारताचे गृहमंत्री यांचे वक्तव्य आणखी चीड आणण्या सारखे आहे ते पत्रकारांना म्हणतात कि मी ही यादी बनवलेली नाही फक्त एकच नाव चुकले आहे, बाकीचे ४९ नावे बरोबर आहे. जेव्हा हि यादी तयार केली असेल तेव्हा ती किती तरी वरिष्ठ अनुभवी अधिकाऱ्यांच्या नजरे खालून गेली असेल.कित्येक वेळा प्रत्येकाचे नावावर चर्चा झाली असेल.आपण आपल्या घराची महिन्याची साधी किराणा यादी तयार करताना घरातील प्रत्येकाचे मत घेतो.नंतर ठरवतो.
दरवर्षी देशाच्या एकूण उत्पनातील फार मोठा भाग हा देश्याच्या सुरक्षे साठी खर्च केला जातो इतक्या मोठ्या खर्चाचे फलित जर हे असेल तर त्याचा उपयोग काय?
तसे पाहीलेतर कोणत्याही देशाची गुप्तचर यंत्रणा ही फार मजबूत असायला हवी. त्यामुळे देशात काय चालले या संबंधी राज्य कर्त्याला माहिती मिळत आसते.श्री शिवाजी महारांजाच्या काळात बहार्जी नाईक सारखे अनेक गुप्तहेर होते म्हणून महारांज शत्रूवर मात करू शकले.शत्रूच्या प्रत्येक हालचालीची खडान्खडा माहिती हे गुप्त हेर महाराजांना देत असत त्यामुळे महाराजांच्या प्रत्येक योजना यशस्वी झाल्या.त्यामुळे आजही अश्या बहार्जी नाईकांची गरज आहे.
गुप्तचर खात्याचे काम असते माहिती खणून काढण्याचे. त्यासाठी ते कसोशीने सर्व प्रकारच्या जोखमी घेऊन माहिती जमा करत असतात. हि जमा केलेली माहिती ते वरिष्ठांपर्यंत म्हणजे अंतिमत: मंत्र्यांपर्यंत पोहोचवतात. आता या जमा झालेल्या माहितीचा उपयोग नेमका कसा करायचा हे सर्वस्वी राजकारण्यांच्या हातात असते. म्हणजे समजा गुप्तचर खात्याने सांगितले कि एखादा नेता देशद्रोही कारवायाना संरक्षण देत आहे अथवा त्याचे पित्ते अमुक अतिरेक्यांना सरकारी बातम्या पुरवत आहेत तर हि माहिती हातात आल्यावर जो मंत्री अथवा पार्टी हाय कमांड असतो तो ठरवतो याचा उपयोग राजकारणासाठी कसा करून घेता येईल, त्या व्यक्तीला कात्रीत पकडून कशा प्रकारे जास्तीत जास्त राजकीय लाभ करून घेता येईल. असे झाल्याने शिक्षा होण्याचे बाजूला राहते आणि सारीपाटाचा खेळ सुरु होतो. हे सर्व हताशपाने बघणार्या गुप्तचर खात्याचे मनोधैर्य हळू हळू खचत जाते, चांगली कर्तुत्वान माणसे या कामातून अंग काढून घेतात, काही स्वत:च मिळालेल्या माहितीचा फायदा उठवतात, तर काही यांत्रिकपणे, टोपल्या टाकल्या प्रमाणे पुढचे काम करत राहतात.
उत्तर द्याहटवातेव्हा गुप्त्चारांना दोष देऊन उपयोग नाही, या देशातल्या सर्व प्रकारच्या अनागोन्दिचा उगम हा राजकारणी लोकांनी इथल्या व्यवस्थेचा जो विचका केला आहे त्यात आहे. हे जो पर्यंत बदलत नाही तो पर्यंत फार अपेक्षा करू नये.