शुक्रवार, ११ मार्च, २०११

सुसंगती सदा घडो

एक सुभाषित "सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो" आपल्याला जर चांगली संगत मिळाली तर आपले विचार चांगले होतात. बालपणा पासून आपल्याला चांगले मार्गदर्शन करणारे मित्र, शिक्षक, लोक भेटले तर त्यांच्या संगतीने आपल्याही आयुष्याचे भले होते.आपल्याला भेटणार्या माणसामध्ये चांगले वाईट गुण असतात.किंवा चांगल्या-वाईट गुणाचे प्रमाण कमी-अधिक असू शकते. त्या माणसामधील चांगले गुण हेरून त्याचा उपयोग आपल्या कसा होईल याचा विचार करावा या साठी शिक्षणाची गरज असते असे नाही याला पाहिजे व्यवहारी ज्ञान. 

सुसंगती बाबत फार पूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवते. जंगला मध्ये हिंडताना दोन मित्रांना एका पोपटाची दोन पिल्ये सापडतात.त्या दोघांचा व्यवसाय आसतो प्राण्याचे मांस विक्रीचा. त्या दोघा पैकी एकाने पिल्लू छान पिंजरा आणून आपल्या दुकानात ठेवले, व त्याला बोलायला शिकवू लागला ,तर दुसर्याने दुसरे पिल्लू देवळातील पुजार्याला देऊन टाकले.व तो आपल्या कामाला निघून गेला. पुजार्याने त्याला देवळाच्या गाभार्यातील पिंजर्या मध्ये ठेवून दिले. बराच काळ गेल्या नंतर तो जेव्हा देव दर्शनाला गेला तेव्हा त्याने पुजाऱ्या कडे पोपटा विषयी चौकशी केली. पुजार्याने त्याला सांगितले कि तुम्ही दिलेल्या पोपटाने मी म्हणतो ते सर्व मंत्र पाठ केले आहे. व तो माझ्या प्रमाणे दर्शनाला येणाऱ्या भक्तांची आदराने बोलतो. हे ऐकून त्याला फार आनंद झाला.व त्याने त्या पोपटाला चांगल्या माणसाच्या स्वाधीन करण्याचे सत्कृत्य केले या बाबत फार समाधान वाटले.

तसाच तो आपल्या मित्राला भेटायाला त्याच्या दुकानात गेला. तिथे गेल्यावर वेगळाच प्रकार त्याच्या लक्षात आला. त्या मित्राच्या दुकानातील पोपट रस्त्यावरून जाणार्या लोकांना शिव्या देत होता. दुकानात येणाऱ्या गीर्हयीकावर ओरडत होता. त्याला हे सर्व पाहून फार आश्चर्य वाटले कि एकाच पोपटाची हि दोन पिल्ये आहेत त्या पैकी एक जन शांत.सुस्वभावी सर्वांशी चांगला वागणारा आहे तर दुसरा स्वभावाने उग्र, शिव्या देणारा. हे पाहून त्याचे मन विचलित झाले. तो परत देवळात आला व त्याने झालेला प्रकार पुजार्याच्या कानावर घातला.

यावर पुजारी म्हणाला याला म्हणतात संगतीचा परिणाम.  एक जन देवळातील भजने, स्त्रोत्र -मंत्र एकूण तसे बोलू  लागला म्हणजे  चांगल्या लोकाच्या संगतीत राहून त्याने चांगले गुण घेतले या उलट दुसरे पिल्लू मित्राच्या दुकानात होते त्याचा व्यवसाय हा मांस विक्रीचा असून तो नेहमी त्याचं हात खालील लोकांना नेहमी शिव्या देऊन काम सांगायचा. त्या पोपटाच्या कानावर नेहमी अपशब्द पडत गेले. त्यामुळे त्या पिलाने ते लक्षात ठेवले.तर या पिल्ल्याचा कानावर नेहमी देवाचे नाव पडत होते त्याने ते लक्षात ठेवले.

म्हणून नेहमी चांगल्या लोकाच्या सहवासात राहावे.चांगल्या लोकांचा सहवास लाभल्या मुळे आपल्यालाही चार चांगल्या गोष्टी मिळतात.

२ टिप्पण्या: