सोमवार, २१ मार्च, २०११

ती......... एक दुपार

                     रोहन सकाळी नेहमी प्रमाणे लवकर ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला.तशी वीणा ही स्वयंपाकाला लागली.त्याचे लग्न होऊन जेमतेम दहा दिवस झाले होते. आणि आज रोहन लग्नाच्या सुट्टी  नंतर पहिल्यांदाच ऑफिसला निघाला होता. रोहन पुण्याला शिक्षणा साठी आला होता.तिथेच त्याला नौकरी पण लागली.तो कामात हुशार असल्या मुळे त्याला प्रमोशन पण मिळून तो मैनेजेर झाला. आधी तो ऑफिस जवळ दोघा पार्टनर सोबत रूम घेऊन राहत होता पण लग्न ठरल्या मुळे तो स्वतंत्र फ्ल्याट भाड्याने राहण्या साठी शोधत होता. बरीच शोधाशोध केल्या नंतर त्याच्याच कंपनीतील एका मित्राच्या बहिणीचा हा फ्ल्याट होता.ती नागपूरला राहत होती तिने आपल्या मुलाला पुण्यात शिक्षण घेण्यासाठी राहण्या करिता घेतला होता.हा फ्ल्याट त्याला फक्त तीन-चार महिन्या साठी मिळाला होता.फ्यात तसा मुख्य वसती पासून लांब व आजूबाजूला फार कमी वस्ती होती आजूबाजूचे बांधकाम अजूनही अपूर्ण अवस्थेत होते ह्याच्या फ्ल्याट च्या इमारती मध्ये एक दोन कुटुंब्ये राहावयास आली होती ह्याचा फ्ल्याट पाचव्या मजल्यावर होता व त्याच्या आजूबाजूचे सर्व फ्ल्याट खाली होते व तिसर्या मजल्यावर श्री साने राहत होते.त्याच्या कडे मोजून पाच माणसे राहत होती. गावी जाण्याच्या दोन दिवस अगोदर त्याच्या ताब्यात मिळाला होता.

                 टेबलावर जेवताना त्याने वीणाला सांगितले कि मी ऑफिसला गेल्यावर एकदम दरवाजा उघडू नको प्रथम आलेला व्यक्ती कोण आहे या बाबत नीट विचारपूस कर.खात्री झाल्याशिवाय दार उघडू नको.पेटीमधील डाग दागिने नीट कपाटात ठेऊन कुलूप लाव. दुपारी जरा सावधपणे झोप.फार भीती वाटलीतर खाली साने कडे जावून ये.त्याच्या सारख्या सूचना देणे सुरु होते ती फक्त कहाणी ऐकावी तशी हो म्हणून मान डोलवित होती.मनातून ती फार घाबरत होती. कारण तिला लग्ना अगोदर घरी कधीच एकटी राहाचे काम पडले नाही. तिच्या माहेरी एकत्र कुटुंब पद्धती असल्या मुळे सतत घरात कोणी सोबतीला असायचे.आणि घरचे लोग पण तिला एकटे ठेवत नव्हते. त्यामुळे एकट राहण्याचा प्रसंग लाग्नाधी तिच्यावर आलाच नाही.हि पहिलीच वेळ असल्यामुळे ती मनातून खूप घाबरली होती पण ती चेहर्या वरून तसे त्याला समजू देत नव्हती.

                 त्याने आपली bag घेतली व तो खाली आला त्याने जाता जाता साने काकूला वीणा घरी एकटी असल्या मुळे जरा लक्ष ठेवण्याची विनंती करून तो ऑफिसला निघाला.इकडे वीणाने जरा सामानाची आवारावर केली.सर्व दारे खिडक्या बंद आहेत याची खात्री करून तीने मासिक वाचायला घेतले.काल रात्री प्रवासात झोप न झाल्यामुळे तिला मासिक वाचत असताना तिचा केव्हा डोळा लागला तिला समजले नाही.

                 काही वेळाने दोन चोर समोरच्या दाराचे कुलूप तोडून तिच्या घरात शिरले. ते आपापसात कुजबुजत होते.कारण त्यांना ह्या घरात कोणीच राहत नाही अशी माहिती मिळाली होती परंतु वीणाला एकटे घरात पाहून तेही घाबरले होते. त्यापैकी एकाने वीणाला झोपेतून जागे केले.समोर दोन अनोळखी इसम पाहून ती पण घाबरली.ती मोठयाने ओरडणार तितक्यात एकाने तिचे तोंड दाबले व जवळील मोठा चाकू काढून तिच्या गळ्याजवळ धरला .ते सारखे तिच्या जवळ किल्याची मागणी करू लागले.पण ती देण्यास तयार होत नव्हती.एकाने जबरीने तिच्या कानातले ओढले त्यामुळे कानातून रक्त वाहू लागले.तरी पण तिने काही चाब्या दिल्या नाहीत.परत त्याने हातावर चाकूने दोन-तीन वार केले.सगळ्या कपड्यावर रक्त वाहू लागले. शेवटी तिने कपाटाच्या चाब्या बेड रूम मधील पर्स मध्ये असल्याचे सांगितले.दोघानीपण तिला खाली ढकलून बेड रूम कडे आपला मोर्चा वळवला. ते दोन चोर आत गेल्याचे पाहून तिने बेड रूमचा दरवाजा बाहेरून लावून घेतला.दोन्ही चोर आत मध्ये कोंडले गेले. तिने लगेच रोहनला मोबाईल लावला व घडलेली घटना सागितली.त्याला हे सर्व समजल्यावर त्याने लगेच साने काकांना फोन केला व घरी जाण्यास सांगितले व तो घरी निघाला.सानेकाका लगेच वर आले व त्यांनी वीणाला धीर देवून पोलिसांना फोन लावला.थोड्यावेळाने पोलीस आले व त्या चोरांना ताब्यात घेऊन गेली.रोहन घरी आला.वीणाच्या कपड्यावरील व खाली सांडलेले रक्त पाहून त्याला घडलेला प्रसंग किती भयानक होता.याची जाणीव झाली.पण वीणा ने ज्या हिमतीने व हुशारीने आलेल्या प्रसंगाला तोंड दिले.या बद्दल  त्याने तिचे कौतुक पण केले.त्याने तिला ताबडतोब दवाखान्यात नेले. व काही दिवसाने तो फ्ल्याट त्याने सोडून दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा