आज दुपारी बाजारातील जनरल स्टोअर्स मध्ये पेन विकत घेण्यासाठी गेलो.दुकानात गर्दी असल्यामुळे बराचवेळ प्रतीक्षा करावी लागली थोड्यावेळाने दुकान मालकाचे लक्ष माझ्याकडे गेले व तो म्हणाला, " काय पाहिजे?
"मला एक चांगला पेन दाखवा." मी म्हणालो.
व तो पेन आणायला आत गेला.
मी दुकानातील इतर वस्तू पाहत होतो.त्या दुकानात काचावर लावलेल्या एका सुविचारावर माझे लक्ष केंद्रित झाले. तो सुविचार होता.
""जगामध्ये कर्णा पेक्षा मोठा दानी व्यक्ती कोण आहे?
खालच्या ओळीवर लिहले होते
"कंजूष व्यक्ती" कारण कि कंजूष व्यक्ती!
आपले सर्व आयुष्य पै पै जोडण्या मध्ये घालवतो व शेवटी इतरांसाठी सर्व सोडून एकटाच निघून जातो.
सदर सुविचार मी दोन तीन वेळा वाचला. तेवढ्यात दुकानदाराने माझ्या समोर सात आठ प्रकारचे पेन टाकले.त्यातील एक पेन मी निवडला व पैसे देऊन मी बाहेर पडलो. परंतु माझ्या मनातील तो कंजूस व्यक्ती काळी केल्या जात नव्हता. खरच एका बाजूने विचार केला तर आपण कमावलेला पैसा अडका त्याचा उपभोग आपण का नाही घ्यायचा.कशाला आपल्या पुढचा पिढीसाठी आपण पैसा कमवायचा.जसे देवाने पैसा कामवयासाठी आपल्याला दोन हात दिले, तसे त्यानाही (पुढच्या पिढीला) पण दिले आहे या जगात तेही पैसा प्रतिष्ठा तेही कमावतील ज्याने तोंड दिले आहे तो घासही देईल. आजचा आलेला क्षण आपण जगायचं पुढच्या पिढीचे कोणी पहिले.
नंतर लक्षात आले कि असाच जर विचार आपल्या आई वडिलांनी केला असता तर?, आपण लहान असताना आपल्याला तळहातावरील फोड प्रमाणे जपले.स्वताला परवडत नसताना देखील आपल्याला चांगल्या शाळेत शिकवले,आपल्या वर चांगले संस्कार आपल्याला चांगल्या समाज्याच्या लायक बनविले. जर त्यांनी आपल्याला चांगले शिक्षण दिले नसते तर आपण आज जे आहोत या पेक्षा खालचा दर्ज्यावर असतो.आपण आज जे काही आहोत ते त्यांनी वेळोवेळी केलेल्या त्यागामुळेच.
वरील सुविचारातील कंजूस व्यक्ती प्रमाणात योग्य वाटते तरी पण आपल्या कमाई मधील पंचवीस टक्के रक्कम आपणावर खर्च करावी उर्वरित रक्कम पुढच्या पिढी साठी त्यांना फक्त अडी अडचणी मध्ये कामात येईल यासाठी ठेवावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा