शनिवार, २६ मार्च, २०११

वैश्विक वसुंधरा तास

वीज हि कोणत्याही देशाची राष्ट्रीय संपत्ती असते.आज जगभरात जवळ जवळ १३१ पेक्षा जास्त देशामधील पाच हजार शहरात एक तास वीज बंद ठेवून "वैश्विक वसुंधरा" तास पाळण्यात येणार आहे.दर वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पाळण्यात येतो.या दिवशी रात्री ८.३० ते ९.३० काळात शहरातील सर्व वीज दिवे बंद ठेवण्यात येतात. याची सुरवात सन २००७ पासून ओस्ट्रेलिया या देशापासून झाली.सध्या जगातील सर्व देशांना गोबल वार्मिंग चा प्रश्न चांगला भेडसावत आहे. सर्वीकडे पृथ्वीवरचे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.या मुळे बर्फाळ भागातील बर्फ सारखा वितळत असून पर्यावरणा साठी मोठा धोका निर्माण होत आहे.आज मानवाच्या जीवनात सकाळी झोपेतून उठल्या पासून  रात्री झोपेपर्यंत विजेच्या वापराचा अतिरेक झाल्यामुळे ग्लोबल वार्मिंग चे संकट जगासमोर उभे राहिले आहे.बहुतांशी देशा मध्ये वीज निर्माण करतांना कोळसा चा वापर करतात.या मुळे निर्माण होणारी राख सर्वत्र पसरते.त्यामुळे त्या भागात राहणाऱ्या लोकांना श्वसनाचे आजार निर्माण होतात.

यावर महाराष्ट्र सरकारने भार नियमनाचा उपाय काढला आहे परंतु हे भार नियमन राज्यातील खेडे विभागात जास्त राबविण्यात येते. विजेचा जास्त वापर हा खेड्यात नसून शहरात आहे. शहरांना वीज कमी पडू नये म्हणून खेड्यात भारनियमन करण्यात येते. तेव्हा हा वैश्विक वसुंधरा तास शहरांसाठी किती महत्वाचा आहे. या एकतासात शहरातील मोठ मोठे कारखाने काही काळासाठी बंद राहतील आणि त्याच काळामध्ये वीज निर्माण करणारे उर्जा प्रकाल्पामधील निर्माण होणारी वीज खेड्याकडे वळवता येईल. या साठी आपण सर्व जन या सहभागी होवून राष्ट्राची संपत्ती वाचवू.


1 टिप्पणी:

  1. अशाप्रकारचा एकच तास पाळण्याएवजी पॉवर सेव्हर वापरणे, इलेक्ट्रॉनिक ट्यूबलाईट व LED लाईटस् वापरणे, दुधी काचांएवजी one sided mirror वापरणे (कायम) अधिक उपयुक्त ठरेल.

    उत्तर द्याहटवा