सोमवार, १ ऑगस्ट, २०११

बस एक नजर चाहिये

 गेल्या ६-७ महिन्यान पासून सेवाग्राम आश्रमातील लोक गांधीजींचा चष्मा शोधतात पण तो काही सापडत नाही. सेवाग्राम (वर्धा महाराष्ट्र राज्य) येथे गांधीजींचा आश्रम असून तेथे गांधीजीच्या वापरातील वस्तू ठेवल्या आहेत. त्या पैकी हा चष्मा होता तो काही महिन्या पासून हरवला आहे किंवा चोरीला गेला आहे. अजून पर्यंत काही सापडला नाही.सर्वी कडे शोधाशोध सुरु आहे. 


तस पहिलतर माणूस ज्या प्रकारचा चष्मा डोळ्यावर लावतो त्याला सारे जग तसे दिसते असे म्हणतात येथे चष्मा न लावता  नजर च मेली आहे. रस्त्याने आपण जाताना जर कोणाचा अपघात झाला किंवा कोणी संकटात दिसला तर आपण त्याला मदत करण्या ऐवजी उगाच फुकट वेळ जाईल, फालतू पोलिसांचे लचांड मागे लागेल,हे तर नेहमीचेच आहे हा विचार करून त्या कडे दुर्लक्ष करतो. याचा अर्थ असा कि आपली नजर मेली आहे.पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.मानवतेच्या गप्पा मारणारे आपण दुसर्याला मदत करण्याची वेळ आली कि आपण आपला फायदा काय याचा विचार करतो. 


गांधीजी चा सर्वानकडे माणूस म्हणून पाहायचे प्रत्येक माणसात ईश्वरी अंश आसतो नजर लागते फक्त ओळखण्याची,  हि नजर च हरविली आहे. अश्या नजर हरविलेल्या लोकांना हा चष्मा सापडेलच कसा. सकाळी उठल्यावर आपण वर्तमान पत्र वाचतो त्यामध्ये अपहरण,घोटाळा,खून अश्या बातम्या ठासून भरलेल्या आसतात आणि आपण मोठ्या चवीने त्या वाचत आसतो.व सरकारला दोष देवून आपल्या नियमित कामाला लागतो.


 जगात स्पर्धा वाढल्या मुळे प्रत्येक जन आपल्या कामात मग्न आसतो. अंतिम ध्येय हे पैसा असल्या मुळे तो जास्तीत जास्त कसा कमावता येईल या कडे सर्वांचे लक्ष आसते आपल्या आजूबाजूला काय घडत आहे या कडे आपले लक्ष नाही. पैसा कमविण्या साठी कोणत्याही थराला जायची आपली तयारी असते. यातूनच २ जी  सारखे घोटाळे जन्माला आले. सत्य, अहिंसा, परोपकार आदी गोष्टी खूप मागे पडल्या आहे. आणि ह्या गोष्टी समजविण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला कोणी जुमानत नाही. आपण जर आपली जर नजर (दृष्टीकोन) बदललात तर हा चष्मा नक्कीच सापडेल.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा