रविवार, २८ ऑगस्ट, २०११

" मी अण्णा हजारे आहे"

आज अण्णा च्या लढाईचा एक टप्पा पार पडला. सरकारने मजबुरीने का होईना संसदे मध्ये जन लोकपाल विधेयकाला पाठींबा दर्शविला.किवा आंदोलना पुढे सरकार दोन पाऊले मागे आली.आता आपली म्हणजे भारतीयांची एक जवाबदारी वाढली जो पर्यंत विध्येयक संसदेत पारित होऊन कायदा तयार होत नाही तो पर्यंत अण्णा जेव्हा जेव्हा आवाज देतील तेव्हा त्यांच्या पाठीशी असेच एक होऊन उभे राहायचं. 


आणि अजून एक काम करावयाचे अण्णाची टोपी म्हणजे " मी अण्णा हजारे आहे" लिहलेली हि पांढरी टोपी घालून आपले कोणतेही शासकीय काम आसो ते होत नसेल किंवा आपल्याला ते करण्या साठी लाच मागितली जात असेल सरकारी बाबू ते करण्यास टाळाटाळ करीत असेल हि टोपी घालून जाऊ.समोरचा सरकारी कर्मचारी वचकून जाऊन ते काम लवकर करेल.आश्या रीतीने आपला त्याचावर वाचक निर्माण होईल.अण्णांच्या भ्रष्टाचार संपविण्याच्या कार्यात आपला सहभाग असेल. आणि अण्णांनी लावली ज्योत आशीच तेवत राहील. 

1 टिप्पणी:

  1. नमस्कार,
    माझे दैवत या ठिकाणी असलेल्या लिंकमध्ये mahapooja.blogspot.com ऐवजी www.tuljabhavani.in असा बदल करावा .
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा