माझ गाव बुलडाणा
एक शांत शहर म्हणून याची ओळख.
फार पूर्वी येथे भिल्ल लोकांची वस्ती होती म्हणून याला भिल्लथाना म्हणत कालांतराने भिलथान्याचे बुलडाणा जाहले
सातपुड्याच्या कुशीत वसलेलं चारही बाजूनी हिरवे डोंगर
या गावात ७५ टक्के सरकारी नौकारदार आहेत
एके काळी हे गाव थंड हवेसाठी प्रसिद्ध होते परंतु आता गावाच्या भोवताली सिमेंटचे जंगल झाल्यामुळे व मोठ्याप्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे शहरात उष्णता जाणवते.
माझ्या गावात नौकारदार वर्ग असल्यामुळे जो तो आपापल्या कामात व्यस्त असतो बहुतेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर नौकारीतले शेवटची वर्ष यागावची निवड करून येथेच राहतात
माझ्या गावात ना रेल्वे ना विमानतळ तरी या गावाची ओळख महाराष्ट्रात जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून आहे.
येथे सर्व जाती पंथाचे लोक राहतात राजकारणात हा मतदार संघ राखीव तरीही
या माझ्या गावाची शैक्षणिक दृष्ट्या चांगली प्रगती झाली आहे एक वैद्यकिय शिक्षण सोडलेतर सर्वप्रकारचे तांत्रिक, अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची सोय येथे आहे