|
फुलारे उघड उघड पाकळी |
आज सकाळी बरोबर ५ वाजता जाग आली. पटकन आथरून सोडले सकाळचे प्रातविधी लवकर आटोपले व चहाचे अमृत घेऊन ५.३० वाजता फिरायला निघालो एकटाच. मुख्य रस्त्याला आल्यावर नेहमीचे लोक दिसले. त्याच्याशी राम राम झाल्यावर चालता चालता एक एक विषय निघू लागले म्हणजे राजकारणातील चालू घडामोडी राजकारणातील राजकारण. तसं पहिलतर राजकारणात मला काही रस नाही. राजकारणातील माझा सहभाग फक्त मतदाना पुरता कारण माझे स्पष्ट मत आहे कि आज काल जे राजकारणी लोक राजकारण करतात ते फक्त स्वार्थासाठी त्यांना ज्या समाजाने निवडून दिले त्या समाजाच्या भल्यासाठी नाही. जे पुढारी आपल्या स्वताच्या घरासमोरील खांबावरील नगरपालिकेचा लाईट लावण्या मागे राजकारण करतात ते समाजाचे काय भले करू शकणार? असो
नंतर विषय निघाला तो काळ्या धनाचा! भारतातील लोकांनी जे विदेशामधील बँकामध्ये जो पैसा नेला त्याचा. खरतर इंग्रजांना जे करायला दीडशे वर्ष लागली ते भारतीय राजकारणी लोकांनी अवघ्या पन्नास वर्षात करून दाखविले त्यांनी काही हजार कोटी रुपये पन्नास वर्षात लुटून नेले हे जर पैसे भारतात परत आणले तर भारताची ओळख एक विकसित देश म्हणून जगाला होईल. प्रयत्न सुरु झाले आहेत पाहू काय होते ते कारण भारतीय राजकारणी लोकांचा अनुभव आपण गेले साठ वर्षे आपण घेत आहोत यांना निवडणुका आल्या कि सर्व विषय आठवतात. एकदा निवडून आल्यावर स्वार्थचे राजकारण करायचे असे वर्षानुवर्षे चालू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा