मंगळवार, ५ एप्रिल, २०११

इतर खेळांना पण राजाश्रय मिळाला पाहिजे...

  भारताने २८ वर्षानंतर क्रिकेट चा विश्व चषक मिळवला त्याबद्दल सर्व खेळाडूचे हार्दिक अभिनंदन.......
 भारताचा तिरंगा क्रिकेटच्या विश्वामध्ये अभिमानाने फडकविणार्या खेळाडूवर सगळीकडून अभिनंदनाचा व बक्षिसाचा वर्षाव होत आहे.आयसीसी कडून भारतीय संघाला १३.२० कोटी रुपये तर बीसीसीआय ने प्रत्येक खेळाडूला एक एक कोटी रुपयाचे बक्षीस मिळणार आहे.महाराष्ट्र सरकारही एक एक कोटी रुपये देणार आहे.कर्नाटक सरकार प्रत्येक खेळाडूंना एक भूखंड देणार आहे, दिल्ली सरकारही एक एक कोटी रुपये देणार आहे. म्हणजे भारतीय संघामध्ये ज्या ज्या राज्याचे खेळाडू आहे ती ती राज्ये त्यांना बक्षीस देणार आहे.अश्या रीतीने प्रत्येक खेळाडू मालामाल होणार आहे.

सरकार कडे जमा होणाऱ्या पैश्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे कर,उपकर. हा पैसा जनतेने आपल्या उत्पन्नातून व्यवहारातून कराच्या स्वरुपात शासन दरबारी जमा केला असतो.शासन या पैश्याचा वापर जनतेला सुखसुविधा,सुरक्षा पुरवण्या नवनवीन योजना साठी व शासनाचा खर्च भागविण्या साठी करीत असते.परंतु अश्या प्रकारची खेळाडूना मोठमोठ्या रकमेची बक्षिसे देण्याचा अधिकार शासनाला आहे काय?.खर तर खेळाच्या तिकीट विक्रीतून जमा होणाऱ्या उत्पन्नातून बक्षिसे देणे हे योग्य आहे. 

शासनाने हा पैसा राज्यातील इतर नवोदित खेळाडूना त्यांचा खेळ सुधारण्यासाठी,त्यांना त्यांच्या खेळासाठी आवश्यक असणारी आधुनिक साधने, नवीन मैदाने खेळाविषयी इतर सवलती आदी साठी वापरला तर क्रिकेट शिवाय इतर खेळातही आपला देश नाव कमवील. ओलम्पिक मध्ये आपला देश पहिल्या दहा मध्ये पण नसतो. एखाद दोन खेळात चांगली कामगिरी सोडलीतर बाकीच्या खेळात आपले खेळाडू इतर देशांच्या तुलनेत तग धरू शकत नाही..चीन,जपान, उत्तर कोरिया सारख्या देशात खेळांना अधिक महत्व दिले जाते. तेथील सरकार त्यांच्या देश्यातील तरुणांना खेळात चांगल्या सुविधा उपलब्द करून प्रोत्साहन देतात.म्हणून त्याचे खेळाडू सर्व प्रकारच्या खेळात अग्रेसर राहतात.

आपल्या कडे एक किकेटचा खेळ सोडला तर हॉकी,कब्बडी,फुटबॉल,रानिग भारतीय परंपरागत खेळ या इतर खेळामध्ये कोणी क्यारिअर म्हणून पाहत नाही याचे मुख्य कारण म्हणजे ह्या खेळात नाव कमविले तरी खेळाडूला जास्त पैसा मिळत नाही.किंवा त्याचे नाव कायमचे लोकांच्या ध्यानात राहत नाही.पण क्रिकेट मध्ये एक जरी सामना एखद्या खेळाडूने खेळला तर त्याचे नाव लोक विसरत नाही.क्रिकेट मुळे त्याला फार प्रसिद्धी मिळते.व तो लोकांच्या कायम मनात राहतो.एकूण काय इतर खेलापेक्ष्या क्रिकेट मध्ये फार पैसा व प्रसिद्धी आहे.

तेव्हा क्रिकेट ला जास्त महत्व न देता इतर खेळ कसे लोकप्रिय होतील व त्या मध्ये नव नवीन खेळाडू कसे तयार होतील या साठी शासनाने नवीन क्रीडा विषयीचे धोरण ठरवून त्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. इतर खेळातील खेळाडूंना सर्वच स्तरातून प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. जसा क्रिकेटला राजाश्रय मिळाला तसा इतर खेळला पण मिळाला पाहिजे.इतकी इच्छा आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा