भारताच्या राजधानी मध्ये जनालोकपाल विध्येयाकासाठी जंतर मंतर चौकात अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला देशभरातून व सर्व स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याला जनांदोलनाचे स्वरूप प्राप्त होत आहे.सायंकाळच्या बातमीपत्रानुसार सरकारने अण्णाच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या असून उपोषण संपण्याच्या अंतिम टप्यात आहे.
भारताने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे म्हणजे, "लोकांनी,लोकांतर्फे लोकांसाठी चालवलेली शासन व्यवस्था." ही व्यवस्था ज्या लोकांच्या हातात असते, त्या लोकांना त्याची मस्ती चढते ही चढलेली मस्ती उतरविण्याचे काम उपोषण नावाचे हथियार करीत असते.ह्या हत्याराचा वापर महात्मा गांधी यांनी फार चांगला केला.आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.किंवा शासनावर वचक,अंकुश ठेवण्याचे काम लोकांचे उपोषण करीत असते. उपोषण करण्याचा तुमचा हेतू जर लोक कल्याणाचा असेल तर त्याला विविध क्षेत्रातून पाठींबा मिळत जातो. शासनातील राजकारणी लोक जर शासन व्यवस्थेचा वापर जर स्वतःच्या स्वार्थासाठी करीत असतील तर त्यांना लोकांनी उपोषणाचा वापर करून समज दिली आहे.हे आपण कित्येक वेळा पहिले आहे.जगात प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते.कोणत्याही प्रकारची हिंसा न करता जगातील सर्व समस्या सोडवता येतात असा महात्मा गांधी चा विश्वास होता. आणि ह्याचा प्रत्यय त्यांनी अनेकदा आणून दिला.पण तत्कालीन स्वार्थी राजकारण्यांनी त्याचा घात केला.
आम्ह्च्या शहरात एक चौक आहे.त्या चौकात दर हप्त्याला कोणींकोनी कसल्या तरी कारणासाठी उपोषणाला तंबू लावून बसलेला असतो.आम्ही त्या चौकाला उपोषण चौक म्हणतो.देशातील सर्व स्तरातील लोकांना शासन दरबारी शासकीय कामासाठी जावे लागते.आज काल सर्व सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार बोलकावलेला आहे अधिकारी वर्गाला टेबला खालून पैसे दिल्या शिवाय ते काम करीत नाही.ज्यांच्या जवळ पैसा आहे त्याची कामे ही लोक पटापट करतात पण हातावर जीवन जगणाऱ्या गरिबाच्या कामाचे काय? तेंव्हा त्यांना आपले काम करून घेण्यासाठी उपोषण नावाच्या हत्याराचा वापर करावा लागतो.
तेंव्हा अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या लढयामध्ये आपणही आपल्याला जमेल त्या मार्गाने सहभागी होवू.व महात्मा गांधीनी दिलेल्या अनोख्या शस्त्राचा वापर या पुढे शासनावर अंकुश ठेवण्यासाठी करू.
\\जय हिंद\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा