विदेशामध्ये असलेला भारतीयांचा (?) काळा पैसा आणण्यासाठी बाबा रामदेव भारतभर आंदोलनात अग्रेसर आहे. त्याला माझा पूर्ण पाठींबा आहे.जसा हा पैसा भारतात एक दिवस नक्की येईल.
पण भारतातील अनेक मोठया देवस्थाना जवळ असलेला अमाप संपती आहे.ह्या देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न एका राज्याच्या उत्पनापेक्ष्या निश्चित जास्त आहे.भारतीय लोक दैववादी आहे देवाला मानणारे आहे. आपल्या उत्पन्नातील काही भाग देवाला अर्पण करावा,किंवा दान धर्म केल्याने पुण्य मिळते. असे संस्कार त्याच्यावर झालेले असतात. तेव्हा ते त्यांना जमेल तितका हिस्सा देवाला म्हणजे देवाच्या नावाने तयार झालेल्या संस्थानाला दान देत असतात. याच कृतीतून जितका देवाचा प्रकोप जास्त तितके त्याच्या नावाने तयार झालेल्या देवस्थानाला उत्पन जास्त.परंतु गेल्या काही दशकात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळल्या मुले लोकांचे उत्पन्न पण वाढले. आणि पाप लागू नये म्हणून दानधर्माच्या रकमेतही वाढ झाली.यामुळे देवस्थानच्या उत्पनात वाढ झाली.या संस्थांच्या नावावर त्यांच्या पिढ्यानपिढ्या जगू लागल्या व संस्थानावर आपलेच वर्चस्व राहावे या साठी घाणरडे राजकारण सुरु झाले.भारतात जितके कठोर कायदे आहेत पण तितक्या पळवाटा पण आहे असे संस्थानिक मोठमोठ्या कायदे पंडितांची फौज बाळगून असतात.त्यामुळे त्याच्या वर कोणी आरोप केले तर ते या कायदे पंडितांच्या मदतीने सहज आरोपातून मोकळे होतात. सरकारही त्यांच्या भानगडीत पडत नाही.
भ्रष्ट मार्गाने येणारा पैसा त्याचा सोबत पाप ही घेऊन येतो. या पापाचा आपल्या कुटुंबावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून हे लोक नेहमी दान करीत असतात.कारण त्यांचा समज असतो कि दान केल्याने पाप कमी होते.
दान देणाऱ्या मध्ये सर्वात आघाडीवर राजकारणी, मोठया हुद्दयाचे, श्रीमंत लोक असतात.त्यांचीच चर्चा सर्वत्र होत असते. किंवा हे लोक अश्या प्रकारच्या बातम्या स्वत छापून आणतात.स्वताचा उदोउदो करून घेतात. आणि आपणही अश्या बातम्या मोठया चवीने वाचतो.आपण कधी हा विचार करत नाही, ह्या व्यक्तीजवळ इतका पैसा कोठून व कसा आला? आपण फक्त त्याने केलेल्या दानाबद्दल दिवसभर चर्चा करीत बसतो.एखाद्या गरिबाने मेहनतीने कमाविलेल्या धनातून काही देवाला दान दिलेतर त्याची कोठे उल्लेखही होत नाही. देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. तो तर सर्वांचा निर्माता आहे त्याच्या जवळ कश्याचीच कमी नाही.
देवस्थाना जवळ असणारा पैसा हा जर त्या भागातील लोक विकास, शिक्षण या साठी वापरला तर देशातून गरिबी नावाची वस्तू लवकरच नाहीशी होईल. अश्या संस्थानाच्या वर्षानुवर्षे पडून असलेली कोट्यावधी रुपयाची संपती मोकळी करण्या साठी बाबा रामदेव यांनी त्यांच्या नवीन पक्ष्या तर्फे आंदोलन सुरु करावे.कारण भारतातील हा पडून असलेला पैसा भारताच्या विकासासाठी वापरणे तितकेच गरजेचे आहे जितका परदेशातील पैसा भारतात आणणे. नाही का ?
विचारवंत होण्याच्या या राजमार्गावर आपले स्वागत आहे.
उत्तर द्याहटवा