सध्या ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेश चा दौरा सुरु आहे.बांगला देश्याशी परवा झालेल्या सामन्यात वाटसन ने म्हणे पंच्यानाव चेंडूत एकशे पंच्यांशी धावा काढल्या.विश्व चषकातील झालेल्या पराभव व त्यामुळे झालेली मानहानी तीन वेळा विश्व विजेते पद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी फार जिव्हारी लागले आणि अश्या मानसिक अवस्थेमध्ये असताना विश्व क्रिकेट क्षेत्रात फारसा अनुभव नसणाऱ्या बांगला देश्याच्या क्रिकेट टीमशी त्यांचा सामना झाला.हे म्हणजे असे झाले बबर शेर, आधीच भुकेला त्यात त्याच्या समोर गरीब बिचारी शेळी आली तर तो तिचा फडश्या पडणारच.
विक्रम करताना तो भारत,श्रीलंका,इंग्लंड,दक्षिण आफ्रिका सारख्या अनुभवी देशा विरुद्ध खेळताना झाला तर त्याचे महत्व अधिक असते.बांगला देशाची क्रिकेट टीम नवीन असून त्यांच्या खेळाडूना आंतर्राष्टीय सामना खेळण्याचे जास्त अनुभव नाही. अश्यातच त्यांचा सामना विजयासाठी चवताळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी झाला.मग विक्रम होणारच.त्यात काय नवल.उलट आमच्या सचिन तेंडूलकर ने सन २०१० मध्ये क्रिकेट क्षेत्रात बलाढ्य समजल्या जाणार्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नाबाद २०० धावा काढल्या आहेत हा विक्रम तोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाची पुढची पिढी जन्माला यावी लागेल.
ऑस्ट्रेलियाचा जेष्ठ खेळाडू हेडन याने सन २००७ साली न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक १८१ धावा काढल्या होत्या.स्वताच्या खेळाडूचा विक्रम मोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाला चार वर्ष लागली सचिनचा नाबाद २०० धावांचा विक्रम मोडण्यासाठी अजून काही वर्ष त्यांना वाट पहावी लागणार हे मात्र खरे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा