आज जवळपास सर्वच दैनिका मध्ये एक चांगली बातमी वाचायला मिळाली की, देशामध्ये वाघाची संख्या २९५ ने वाढली. वाघांसाठी आरक्षित असणाऱ्या १७ राज्यातील ३९ प्रकल्पामध्ये एकूण १७०६ वाघ आढळले.सन २००६ च्या वाघांच्या गणणे नुसार देशात १४११ वाघ होते. चालू वर्षीच्या गणणे नुसार ही संख्या २९५ ने वाढून १७०६ इतकी झाली.जगातील एकूण वाघांपैकी जवळपास निम्मे वाघ भारतात आहे.वाघाची कमी होणारी संख्या ही सर्वच देश्यापुढे गंभीर समस्या होती.परंतु दूरदृष्टी समोर ठेवून केलेल्या उपाय योजनांचा हा परिणाम आहे.
झपाट्याने कमी होणारया जंगला मुळे जंगलातील प्राणी त्याची तहान-भूक भागवण्यासाठी लगतच्या गावात शिरतात.व गावकरी स्वताच्या जिवाच्या भीतीने त्यांना मारून टाकतात या मध्ये वाघाची संख्या जास्त असल्यामुळे देशभरातून वाघाची संख्या दिवसेंदिवस कमी होत होती परंतु सरकारी उपाय योजनेमुळे आता ही संख्या वाढू लागली आहे.भारतामध्ये वाघांच्या शिकारीवर बंदी असली तरीही वाघाच्या कातडीला चांगली किमत मिळत असल्या मुळे लपून छपून याची शिकार चालू आहे.पण सरकारच्या सतर्क वनविभागा मुळे अश्या प्रकारच्या शिकारीला खीळ बसला आहे.याचे परिणाम आता दिसू लागले आहे.जंगलाचा राजा जर जंगलातून कमी होत गेला तर जंगलात काहीच उरणार नाही.मागे आम्ही विदर्भातील ताडोबाच्या सफारीला गेलो होतो.तिथे दोन दिवस राहून वाघाचे दर्शन आम्हाला झाले नाही.त्यामुळे आम्ही सर्वच उदास झालो होतो परंतु पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा तेथे जाऊ तेव्हा आता आम्हाला नक्कीच वाघाचे दर्शन होईल.